दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. आता सर्वसामान्यांचे बजेट (Budget) कोलमडणार आहे. या वर्षात खाद्यपदार्थांच्या (foods) किमती प्रचंड वाढल्या आहेत. सरकारने प्रयत्न करूनही भाव आटोक्यात येत नाहीत.
ग्राहक मंत्रालयाच्या (Ministry of Consumer Affairs) आकडेवारीनुसार एका वर्षापूर्वी तांदळाची किंमत 34.86 रुपये प्रति किलो होती, ती आता 37.38 रुपये झाली आहे. गहू 25 रुपयांवरून 30.61 रुपये, तर मैदा 29.47 रुपयांवरून 35 रुपये किलो झाली आहे.
उडीद डाळ 104 रुपयांवरून 107 रुपये किलो, मसूर डाळ 88 रुपयांवरून 97 रुपये आणि दूध 48.97 रुपयांवरून 52.41 रुपये प्रतिलिटर झाले आहे.
तूर डाळ वर्षापूर्वी 104 रुपये किलो होती, जी आता 108 रुपये किलो झाली आहे. आरबीआयच्या अंदाजानुसार किरकोळ महागाईचा दर अजूनही 6 टक्क्यांच्या वर राहील. तेलाच्या किमती खुल्या बाजारात 150 रुपयांच्या वर आहेत.
सावधान! जग आणखी एका संकटाच्या उंबरठ्यावर; चीनमध्ये सापडला नवा विषाणू, अनेकांना लागण
Published on: 10 August 2022, 12:40 IST