Others News

शिधापत्रिकेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. अन्न व सार्वजनिक वितरण विभाग शिधापत्रिकेच्या नियमात बदल करत आहे. सरकारी शिधावाटप दुकानातून रेशन घेणाऱ्या पात्र लोकांसाठी ठरवलेल्या मानकांमध्ये विभाग बदल केला जात असून याविषयी नवीन मानकाचा मसुदा आता जवळपास तयार झाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारांसोबत अनेक बैठकाही झाल्या आहेत. नवीन तरतुदीत काय होणार आहे ते जाणून घ्या.

Updated on 26 February, 2022 5:55 PM IST

शिधापत्रिकेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. अन्न व सार्वजनिक वितरण विभाग शिधापत्रिकेच्या नियमात बदल करत आहे. सरकारी शिधावाटप दुकानातून रेशन घेणाऱ्या पात्र लोकांसाठी ठरवलेल्या मानकांमध्ये विभाग बदल केला जात असून याविषयी नवीन मानकाचा मसुदा आता जवळपास तयार झाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारांसोबत अनेक बैठकाही झाल्या आहेत. नवीन तरतुदीत काय होणार आहे ते जाणून घ्या.

श्रीमंत लोकही घेऊ लागले लाभ

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या मते, सध्या देशभरात 80 कोटी लोक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ घेत आहेत. त्यांच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले अनेक लोक आहेत. हे लक्षात घेऊन सार्वजनिक वितरण मंत्रालय मानकांमध्ये बदल करणार आहे. आता कोणतीही गडबड होऊ नये म्हणून नवीन मानक पूर्णपणे पारदर्शक केले जाणार आहेत.

हेही वाचा : Money: घरात नेहमीच असते का पैशांची चणचण? मग गुरुवारी करा 'हा' एकच उपाय; कधीचं पैशांची कमतरता भासणार नाही

का होत आहेत बदल

यासंदर्भात अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपासून मानकांमध्ये बदल करण्याबाबत राज्यांशी बैठक सुरू आहे. राज्यांनी दिलेल्या सूचनांचा समावेश करून पात्रांसाठी नवीन मानके तयार केली जात आहेत. ही मानके लवकरच निश्चित केली जातील. नवीन मानक लागू झाल्यानंतर केवळ पात्र व्यक्तींनाच लाभ मिळेल, अपात्र व्यक्तींना लाभ मिळू शकणार नाही. गरजूंना डोळ्यासमोर ठेवून हा बदल करण्यात येत आहे.

 

वन नेशन, वन रेशन कार्ड योजना

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानुसार, डिसेंबर 2020 पर्यंत 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'एक राष्ट्र, एक रेशन कार्ड (ONORC) योजना' लागू करण्यात आली आहे. सुमारे 69 कोटी लाभार्थी म्हणजेच NFSA अंतर्गत येणाऱ्या लोकसंख्येपैकी 86 टक्के लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. दर महिन्याला सुमारे 1.5 कोटी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन लाभ घेत आहेत.

रेशन कार्डमुळे कमी किमतीत रेशन मिळत असल्याने नागरिकांना आणखी बरेच फायदे मिळतात. केंद्र सरकारने ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना अनेक फायदे मिळतील. रेशन कार्डशी निगडीत सर्व फायदे मिळवण्यासाठी तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.

 

अनेक फायदे मिळतील

देशातील लाखो लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे. रेशनकार्ड अंतर्गत अन्नधान्यासोबत इतर अनेक फायदे आहेत. यामध्ये तुम्ही आधार कार्ड रेशनकार्डशी लिंक करून 'वन नेशन वन रेशन कार्ड' योजनेचा लाभ घेऊ शकता. याच्या मदतीने तुम्ही देशातील कोणत्याही राज्यातील रेशन कार्ड दुकानातून रेशन मिळवू शकता.

English Summary: Big change in rules for buying rations from government shops! Many will not get grain, because know what is
Published on: 26 February 2022, 05:54 IST