सध्या बऱ्याच दिवसापासून सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळत असून सोने आणि चांदी गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींसाठी गुंतवणूकदारांसाठी एक नामी संधी आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सणासुदीचे दिवस सुरू होत असून या सणाच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्यांची दरातील घसरणीमुळे फायदा होईल अशी परिस्थिती आहे.
जर आपण गेल्या सात दिवसांचा विचार केला तर चांदीच्या दरात तब्बल साडेचार ते सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची घट झाली आहे. साधारणतः मागच्यामहिन्यापूर्वी चांदीचे दर 50 हजारांपर्यंत खाली घसरले होते व या परिस्थितीमुळे गुंतवणूकदार यांनी सोने व चांदीची खरेदी करण्याकडे कल वाढवला होता.
परंतु त्याच्या नंतर चांदीच्या भावात तब्बल पाच हजार रुपयांपर्यंत वाढ होऊन प्रति किलो 61000 झाली होती. तसेच सोन्याच्या दरात देखील वाढ झालेली पाहायला मिळाली होती. परंतु या महिन्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे सण किंवा कार्यक्रमाचे मुहूर्त नसल्यामुळे मागणीत घट आली.
नक्की वाचा:Gold Price Update: खुशखबर! सोन्या चांदीच्या दरात घसरण; चांदी 1219 रुपयांनी घसरली...
जर आपण एकंदरीत 15 ऑगस्ट चे सोन्याचे दराचा विचार केला तर ते 53 हजार रुपये प्रति तोळा असे होते परंतु त्यात 52 हजार रुपये तोळा या दराने मिळत आहे.
15 ते 22 ऑगस्ट सोन्या-चांदीचे दर
1- 15 ऑगस्ट- सोने प्रति तोळा 53 हजार रुपये ते चांदी 61 हजार रुपये किलो
2- 16 ऑगस्ट- सोने प्रति तोळा 52500 तर चांदी साठ हजार रुपये प्रतिकिलो
3- 22 ऑगस्ट- सोने 52 हजार रुपये प्रति तोळा ते चांदी 56 हजार पाचशे रुपये प्रतिकिलो
Published on: 23 August 2022, 09:44 IST