Others News

असंघटीत कामगारांनी जर ई-श्रमद्वारे नोंद केली तर १८-४० वर्ष वयातील ज्या व्यक्तींचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपये पेक्षा कमी आहे त्यांना प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजना अंतर्गत प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपयांचे वेतन मिळणार आहे. असंघटित कामगार योजनेचे लाभार्थी चामड्याच्या उद्योगातील कामगार, हातमाग, मध्यान्ह भोजन कामगार, रस्त्यावरील विक्रेते, शेतमजूर, बांधकाम क्षेत्रातील कामगार, चिंध्या वेचणारे, सुतार, मच्छीमार, रिक्षाचालक किंवा ऑटोचालक हे आहेत.

Updated on 18 February, 2022 8:33 AM IST

असंघटीत कामगारांनी जर ई-श्रमद्वारे नोंद केली तर १८-४० वर्ष वयातील ज्या व्यक्तींचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपये पेक्षा कमी आहे त्यांना प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजना अंतर्गत प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपयांचे वेतन मिळणार आहे. असंघटित कामगार योजनेचे लाभार्थी चामड्याच्या उद्योगातील कामगार, हातमाग, मध्यान्ह भोजन कामगार, रस्त्यावरील विक्रेते, शेतमजूर, बांधकाम क्षेत्रातील कामगार, चिंध्या वेचणारे, सुतार, मच्छीमार, रिक्षाचालक किंवा ऑटोचालक हे आहेत.

असंघटित कामगारांचा समावेश करण्यात आला:

केंद्र सरकारने हातावरील पोट असणाऱ्या असंघटित कामगारांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत जे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-श्रमद्वारे नोंद करावी लागणार आहे. काही योजनांचा लाभ हा बँकेच्या माध्यमातून दिला जातो जे की जनधन खात्यातून या योजनेचा हप्ता कपात केला जातो. देशातील आतापर्यंत २५ कोटी ५८ लाख २२ हजार २४६ लोकांनी विविध योजनांची नोंदणी करून केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या eshram.gov.in द्वारे नोंदणी करून श्रमकार्ड घेतले आहे. या योजनांमध्ये असंघटित कामगारांचा समावेश करण्यात आला आहे जे की अर्ज करण्यासाठी ऑनलाइन केंद्रांवर व आपले सरकार सेवा केंद्रांवर जावे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधारकार्ड, बँक खाते क्रमांक तसेच मोबाईल नंबर लागणार आहे.

तुम्ही या योजनांचे लाभार्थी आहात का?

१. व्यापारी, दुकानदार, स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींना राष्ट्रीय पेन्शन योजना :-

या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तींना वयाच्या ६० वर्षानंतर तीन हजार रुपये मासिक विमा निवृत्ती वेतन मिळणार आहे तसेच ज्यांची छोटी दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल्स, रिअल इस्टेट ब्रोकर आहेत आणि त्यांचे वय १८-४० असेल आणि त्याची वार्षिक उलाढाल दीड कोटी रुपये पेक्षा जास्त नसेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभार्थी व्यक्तींना त्यांच्या वयानुसार मासिक हप्ता
५५ - २०० रुपये भेटणार आहे.

२. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना :-

या योजनेमध्ये जर तुमचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला तर तुम्हाला दोन लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. या योजनेचा लाभ १८-५० वयोगटातील व्यक्तींना होणार आहे. बँकेच्या खात्यातून हप्ता कपात होणार आहे.

३. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना :

अपंग किंवा अपघाती मृत्यूसाठी दोन लाख रुपये तर अंशिक अपंगत्वासाठी १ लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. १८-७० वयोगटातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ठराविक काय असेल तर रक्कम तुमच्या खात्यातून कपात केली जाईल.

४. अटल पेन्शन योजना :-

या योजनेतील लाभार्थी व्यक्तीला १-५ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे आणि जर त्या लाभार्थ्याचा मृत्यू झाला की त्याने लावलेल्या वारसाला ती रक्कम दिली जाईल. १८-४० वयातील व्यक्तींनी बँकेत खाते उघडून आधारकार्ड लिंक करावे.

५. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम-वृध्दावस्था संरक्षण :-

विविध वयातील लाभार्थ्यांना ३०० - ५०० रुपये केंद्रीय योगदान दिले जाणार आहे. राज्य सरकारच्या योगदाणानुसार एक ते तीन हजार मासिक पेन्शन भेटणार आहे. ज्या लोकांना कोणताही आधार नाही त्या निराधाराना लाभ मिळणार आहे.

६. आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना :-

लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत ५ लाख रुपये पर्यंत उपचार मिळणार आहे. ज्यांचे वय १६ - ५९ आहे त्या वयातील सदस्य, कच्च्या भिंती, निरोगी प्रौढ सदस्य नसलेले, सफाई कामगार कुटुंब, भूमिहीन कुटुंब अशा लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

English Summary: Beneficiaries who register through e-Shram will get a monthly pension of Rs 3,000 to Rs 5,000 and a pension
Published on: 18 February 2022, 08:33 IST