मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना आहे. शेतकऱ्यांना कर्ज देणे सुलभ व्हावे, याकरिता सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजनाही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सोबत जोडली आहे.
त्याअंतर्गत सरकारने आतापर्यंत जवळ-जवळ 174. 96 लाख प्राप्त अर्जांना मान्यता दिली आहे. या प्राप्त अर्जांवर जवळ-जवळ एक लाख 63 हजार 627 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत 3 लाख रुपये पर्यंतचे कर्ज हे अवघ्या सात टक्के व्याजदराने मिळत आहे.कर्जाची परतफेड वेळेत केली तर तीन टक्के त्याच्यात सूट मिळते.अशाप्रकारे प्रामाणिक कर्ज दात्यांना अवघ्या चार टक्के व्याज दराने पैसे मिळतात. लॉकडाऊन दरम्यान दोन लाख कोटी खर्चाचे मर्यादा असलेली किसान क्रेडिट कार्ड देण्याची घोषणा केली होती.त्यापैकी 25 लाख कार्ड बनविण्यात आली असून त्यामुळे अंतर्गत आणखी 75 लाख शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहे.
किसान क्रेडिट कार्डसाठी लागणारी कागदपत्रे
अर्जदार हा शेतकरी आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याचा महसूल रेकॉर्ड पाहावा लागेल.त्याच्या ओळखीसाठी आधार कार्ड,पॅन कार्ड आणि फोटो काढला जाईल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अर्जदाराचे कर्ज कोणत्याही बँकेत थकबाकी नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल.किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी लागणारे शुल्क रद्द केले आहे.
Published on: 09 February 2021, 05:10 IST