Others News

सध्या राज्यात (State) उष्णतेची चांगलीच लाट आली आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने नागरिकदेखील हैराण झाले आहेत. तसं बघायला गेलं तर तापमानवाढीची (Temperature) अनेक कारणे आहेत मात्र अभ्यासकांच्या संशोधनातून एक असं कारण समोर आले की ज्यामुळे तुम्हीदेखील चकित व्हाल.

Updated on 17 May, 2022 11:40 AM IST

Mumbai : सध्या राज्यात (State) उष्णतेची चांगलीच लाट आली आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने नागरिकदेखील हैराण झाले आहेत. तसं बघायला गेलं तर तापमानवाढीची (Temperature) अनेक कारणे आहेत मात्र अभ्यासकांच्या संशोधनातून एक असं कारण समोर आले की ज्यामुळे तुम्हीदेखील चकित व्हाल. तापमान वाढण्यामागे वृक्ष कारणीभूत (Tree) असल्याचा दावा काही अभ्यासकांनी केला आहे. खरंतर वृक्षांमुळे उष्णता कमी जाणवते.

मात्र ज्या वृक्षांमुळे उष्णतेचा पारा वाढत आहे ते वृक्ष म्हणजे परदेशी वृक्ष (exotic trees) असे अभ्यासकांनी सांगितले आहे. परदेशी वृक्षांची संख्या वाढत असल्याने स्थानिक पातळीवरील तापमानात वाढ होत असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. सध्या देशभरात मार्च व एप्रिल महिन्यातील तापमानचे बरेच रेकॉर्ड मोडले गेले आहेत. या तापमानवाढीला इतर अनेक कारणे असली तरी यात आणखी एक कारण समोर आले आहे ते म्हणजे परदेशी झाडे.

गुलमोहर, पेंटाफोरम, विलायती शिरीष (रेन ट्री), काशीद, नील मोहोर, चिंचेचं झाड यांसारख्या परदेशी झाडांमुळे देखील तापमानात वाढ होत असल्याचा दावा काही अभ्यासकांनी केला आहे. 'नेचर फॉर एव्हर सोसायटी' या पर्यावरणासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थेने याचा खुलासा केला आहे. शिवाय भारतात 15 हजारांहून अधिक झाडांच्या प्रजाती या परदेशी आहेत असं देखील अभ्यासकांनी म्हटले आहे.

बंधुंनो सावधान! जर तुम्ही कुणाला तुमच्या आधार आणि पॅन कार्डची प्रत देत असाल तर निघू शकते तुमच्या नावाने परस्पर लोन

परदेशी झाडांची उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पानगळ होत असते. परिणामी एप्रिल व मे महिन्यात सूर्याची किरणे ही थेट जमिनीवर पडतात. यामुळे जमिनीची उष्णता वाढते आणि त्यामुळे तापमानात बदल होतो. परदेशी झाडांपैकी जवळजवळ 55% झाडांच्या प्रजाती या मूळ अमेरीकेतील आहेत. इंग्रजांच्या काळात बॉटनिक गार्डनच्या विकासासाठी आपल्याकडे परदेशी झाडे आणली गेली आणि हे कार्य पुढील काळात देखील चालत राहिलं.


मात्र, या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. प्रामुख्याने परदेशी झाडांची पानगळ ही उन्हाळ्यात होत असते. त्यामुळे सूर्यकिरणे थेट जमिनीवर पडून जमीनीच्या तापमानात वाढ होते. आणि यामुळेच स्थानिक पातळीवरील तापमान वाढ रोखण्यात ही परदेशी झाडे निरूपयोगी ठरतात असा दावा केला गेला आहे. शिवाय या परदेशी झाडांवर पक्षीदेखील बसत नाहीत, घरटे बनवत नाहीत.

सौंदर्यीकरणासाठीच ह्या झाडांचा वापर होत असल्याचेदेखील अभ्यासकांचे म्हणणे आहे. मात्र, या गोष्टीला काही पर्यावरणवादी अभ्यासकांनी असमर्थता दर्शवली आहे. झाडं कोणतीही असो ती सावली देतातच. प्रामुख्याने शहरातील परिसंस्था या मानवनिर्मित आहेत अशा शहरी भागातील झाडं ही सौंदर्यीकरणासाठी असतात. मात्र परदेशी झाडं चांगली नाहीत किंवा त्यामुळे तापमानवाढ होते असं म्हणणेच चुकीचं आहे.

मुंबईत जवळजवळ 75% झाडं ही परदेशी आहे. तसेच शिवाजी पार्क परिसरातदेखील 50 टक्क्यांहून अधिक परदेशी झाडे असल्याचे अभ्यासक सांगतात. मुंबईत अनेक ठिकाणी सौंदर्यीकरणासाठी परदेशी झाडांचा वापर केला जातो. त्यामुळे मागील काही वर्षात मुंबईतील तापमानात अनेक बदल अनुभवायला मिळाले आहेत.

त्या-त्या भागाची आपली एक वृक्षसंपदा असते. अशा परिस्थितीत स्थानिक भागातील झाडांना प्राधान्य दिल्यास तेथील जैवविविधतेवर कोणताही परिणाम होत नाही.असं असलं तरी अद्यापही देशी झाडांबाबत सरकार दरबारी अनास्था असल्याने परदेशी झाडांचाच सौंदर्यीकरणासाठी केलेला वापर बघायला मिळतो.


महत्वाच्या बातम्या:
या राज्यात कांद्याला महाराष्ट्रापेक्षा जास्त भाव मिळतोय, बघा कोणती आहेत ही राज्ये
खतांबाबत शेतकऱ्यांची चिंता मिटली, खरीप हंगाम आढावा बैठकीत अजितदादांचा मोठा निर्णय

English Summary: Be careful ..! There were shocking reasons for the rise in temperature; Ignore
Published on: 17 May 2022, 11:40 IST