Others News

निर्यात खर्च कमी करून भारतीय आंबा अमेरिकेत रास्त दरात उपलब्ध होण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

Updated on 08 June, 2022 2:34 PM IST

‘निर्यात खर्च कमी करून भारतीय आंबा अमेरिकेत रास्त दरात उपलब्ध होण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. कारण देशातून पहिल्यांदाच समुद्रमार्गे आंबा निर्यात सुरू झाली आहे. हा क्षण ऐतिहासिक आहे,’’ अशी माहिती राज्याचे पणन संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा आणि सानप ॲग्रो ॲनिमल्स यांच्या प्रयत्नांतून समुद्रमार्गे भारतीय आंबा नुकताच अमेरिकेत निर्यात करण्यात आला.

अमेरिकेचे क्वारंटाइन विभागाचे अधिकारी डॉ. कॅथरिन फिडलर, भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरच्या बायोसायन्स विभागाचे संचालक डॉ. टी. के. घंटी, ‘एनपीपीओ’चे उपसंचालक डॉ. झेड. ए. अन्सारी, ‘सानप ॲग्रो’चे संचालक शिवाजीराव सानप, ‘वाफा’चे अध्यक्ष अण्णा शेजवळ यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून हा कंटेनर अमेरिकेसाठी रवाना झाला.पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील म्हणाले,पाच हजार ५२० बॉक्समधून १६ हजार ५६० किलो आंबा कंटेनरद्वारे अमेरिकेला पाठविण्यात आला आहे.

२५ दिवसांच्या सागरी प्रवासानंतर तो न्यूजर्सी शहराजवळील नेवार्क या बंदरात पोहोचणार आहे.’’तीन वर्षे प्रयोग.भभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, अपेडा, पणन मंडळ यांच्यावतीने २०१९ मध्ये आंबा समुद्रमार्गे निर्यातीचा प्रयोग केला होता. यात आंब्यावर विविध प्रक्रिया करून तो कंटेनरमध्ये भरून कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधेद्वारे साठवन करून ठेवला होता. हा कंटेनर ३८ दिवसांनी उघडण्यात आला. त्यावेळी हा आंबा सुस्थितीत होता. मात्र, काही त्रुटी आढळून आल्याने त्या दुरुस्त करण्यात आल्या. त्यानंतर यंदा यशस्वीपणे आंबा निर्यात करण्यात आली आहे.

हवाईमार्गे निर्यातीत मर्यादा- २०१९ मध्ये अमेरिकेस एक हजार २०० टन आंबा निर्यात- २०२० व २०२१ मध्ये कोरोनामुळे निर्यात होऊ शकली नाही.- अमेरिकेला यापूर्वी होणारी आंबा निर्यात हवाईमार्गे होत- निर्यातदारांना प्रतिकिलो ५५० रुपये विमानभाडे द्यावे लागत- अमेरिकेत भारतीय आंबा महाग असल्याने निर्यातीवर मर्यादा आंब्याच्या समुद्रमार्गे निर्यातीमुळे वाहतूक खर्च दहा टक्क्यांवर येणार असल्याने भारतीय आंबा अमेरिकेतील बाजारपेठेत इतर देशांतील आंब्याशी स्पर्धा करू शकेल. तसेच दीड महिन्याच्या जादा कालावधीसाठी तो तेथे उपलब्ध राहील.

 

 - सुनील पवार, कार्यकरी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ.

English Summary: Bapare ... Indian mango by sea to America
Published on: 08 June 2022, 02:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)