Others News

बँक ऑफ बडोदा ने ग्राहकांसाठी एक मोठी ऑफर आणली आहे. यामध्ये बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना सर्व मंजूर वैयक्तिक कर्ज देत असते. ज्यायोगे हे कर्ज तीस सेकंदात आणि फक्त तीन इजी क्लिक मध्ये मिळू शकते.

Updated on 08 January, 2022 2:46 PM IST

बँक ऑफ बडोदा ने ग्राहकांसाठी एक मोठी ऑफर आणली आहे. यामध्ये बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना सर्व मंजूर वैयक्तिक कर्ज देत असते. ज्यायोगे हे कर्ज तीस सेकंदात आणि फक्त तीन इजी क्लिक मध्ये मिळू शकते.

यामुळे खर्चाचे संबंधित कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी आणि सविस्तर माहितीसाठी बँकेच्या ग्राहक BOB, bank of baroda.inअधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करू शकतात.याबाबतची माहिती बँक ऑफ इंडियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर करून दिली आहे.यामध्ये बँकेने लिहिलेआहे की,30 सेकंद. 3 क्लिक. सर्व मंजूर वैयक्तिक कर्ज इतके सोपे कधीच नव्हते.ते आता मिळवा. आजच #bobWorld मध्ये प्रवेश करा.

 याचे फायदे आणि वैशिष्ट्ये

  • ज्या ग्राहकांना हे कर्ज घ्यायचे असेल त्यांनी हे लक्षात ठेवावे की हे कर्ज ऑफलाइन (POS) आणि ऑनलाईन ( ई-कॉमर्स एग्रीगेटर) वरून 50 हजार रुपयांपर्यंत खरेदीसाठी उपलब्ध आहे. याची जास्तीत जास्त मर्यादाही 50 हजार रुपये आहे.
  • हे कर्ज घेताना तुम्ही तीन, सहा, 9,बारा आणि 18 महिन्यांच्या सुलभ हप्त्यावर याचा लाभ घेऊ शकतात.
  • बी ओ बी च्या संकेत स्थळ नुसार बँकेचे ग्राहक मोबाईल बँकिंग ॲप्लिकेशन मध्ये च्या माध्यमातून पन्नास हजार रुपयांपर्यंतच्या क्रीडेसाठी देखील पात्र आहेत.

हे कर्ज कोणाला मिळू शकते?

  • बँकेचे वैयक्तिक बचत खाते धारक जे बँकेच्या पूर्व परिभाषेत अंतर्गत नियमानुसार पात्र आहेत ते या ऑफरचा लाभ देऊ शकतात. यासाठी ग्राहकांचे वय हे कमीत कमी एकवीस वर्ष असावे.
  • जे ग्राहक पात्र आहेत अशा ग्राहकांना एसएमएस किंवा ई-मेलच्या माध्यमातून संबंधित माहिती दिली जाईल.
  • जर ग्राहकांना त्यांची कर्जासाठी ची पात्रता आणि मर्यादा आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी ग्राहक PAPL टाईप करून बँकेच्या खात्याला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरून 8422009988 या नंबर वर एसेमेस पाठवू शकतात.
  • या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाने बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करावे व त्यानंतर ApplyNow या पर्यायावर क्लिक करावे लागेल. व त्यानंतर सूचनांचे पालन करत प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
English Summary: bank of baroda gives personal loan to banks castomer in few second
Published on: 08 January 2022, 02:46 IST