Others News

पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना २०२२-२३ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ‘केळी’

Updated on 14 June, 2022 2:36 PM IST

पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना २०२२-२३ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ‘केळी’ पिकासाठी जास्त तापमान या हवामान धोक्यांतर्गत नुकसान भरपाई रक्कमेस पात्र ठरणार आहे. जिल्ह्यातील १४४ महसूल मंडळांतील गावांना केळीची नुकसान भरपाई मिळेल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली.यामध्ये १ ते ३० एप्रिल या कालावधीत सलग ५ दिवस ४२ सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानामुळे ८३ महसूल मंडळ पात्र ठरली आहे. अशा महसूल मंडळांना ३५ हजार प्रतिहेक्टर या प्रमाणे नुकसान भरपाई रक्कम मिळेल. 

१ ते ३१ मे या कालावधीत सलग ५ दिवस ४५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानामुळे ६१ महसूल मंडळ पात्र ठरली आहे. अशा महसूल मंडळांना ४३ हजार पाचशे प्रतिहेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई मिळेल.एप्रिल व मेमध्ये जास्त तापमान या हवामान धोक्यांतर्गत पात्र ठरलेल्या महसूल मंडळांना जास्तीत जास्त ४३ हजार पाचशे प्रतिहेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई मिळेल. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भारतीय कृषी विमा कंपनीस विमा कालावधी संपताच पात्र शेतकऱ्यांचे खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ वर्ग करण्याचे निर्देश दिले आहे.

महसूल मंडळानिहाय गावे अशी : जळगाव- म्हसावद, भोकर, पिंप्राळा, असोदा. भुसावळ- कुऱ्हे प्र.न, वरणगाव, पिंपळगाव खुर्द, बोदवड- नाडगाव, यावल- भालोद, बामणोद, फैजपूर, साकळी किनगाव बुद्रूक, रावेर- खानापूर, खिरोदा प्र.चा, निंभोरा बुदु्क, खिर्डी, ऐनपूर. मुक्ताईनगर- अंतुर्ली, घोडसगाव, अमळनेर- शिरुड, नगाव, पातोंडा अमळगाव, मारवड, भरवस, वावडे. चोपडा- हातेड बु, लासुर, अडावद, धानोरा प्र.अ, गोरगावले बुद्रूक, चहार्डी, एरंडोल- रिंगणगाव, कासोदा, उत्राण, धरणगाव- साळवा, सोनवद, पिंप्री बुद्रूक, पाळधी, चांदसर, पारोळा- शेळावे, तामसवाडी, चोरवड, चाळीसगाव- मेहुणबार. जामनेर- नेरी, पहुर, पाचोरा-गाळण, नांद्रा, कुऱ्हाड बुद्रूक. भडगाव- कोळगाव.

अशा महसूल मंडळांना ३५ हजार प्रतिहेक्टर या प्रमाणे नुकसान भरपाई रक्कम मिळेल. १ ते ३१ मे या कालावधीत सलग ५ दिवस ४५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानामुळे ६१ महसूल मंडळ पात्र ठरली आहे.अशा महसूल मंडळांना ४३ हजार पाचशे प्रतिहेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई मिळेल.एप्रिल व मेमध्ये जास्त तापमान या हवामान धोक्यांतर्गत पात्र ठरलेल्या महसूल मंडळांना जास्तीत जास्त ४३ हजार पाचशे प्रतिहेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई मिळेल.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भारतीय कृषी विमा कंपनीस विमा कालावधी संपताच पात्र शेतकऱ्यांचे खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ वर्ग करण्याचे निर्देश दिले आहे.

English Summary: Banana compensation to 144 villages in Jalgaon district
Published on: 14 June 2022, 02:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)