Others News

खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक, माध्यमांवर कायम चर्चेत असणारे आणि स्वत:ला कडवट कट्टर शिवभक्त म्हणवून घेणारे बाबाराजे देशमुख यांना मावळ पोलिसांनी अटक केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका बांधकाम अभियंत्याच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Updated on 20 May, 2023 4:44 PM IST

खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक, माध्यमांवर कायम चर्चेत असणारे आणि स्वत:ला कडवट कट्टर शिवभक्त म्हणवून घेणारे बाबाराजे देशमुख यांना मावळ पोलिसांनी अटक केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका बांधकाम अभियंत्याच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मावळच्या शिरगाव पोलिसांनी आज देशमुख यांच्या अटकेची कारवाई केली. त्यांचे सोशल मीडियावर हजारो फॅनफॉलोव्हर्स आहेत. बाबाराजेची मावळच्या बेबडओव्हळमध्ये गट नंबर १९६ या ठिकाणी असलेली पाच एकर जमीन वनीकरण विभागात समाविष्ट आहे. त्या जागेत प्लॉटिंग होत नाही. हे माहित असताना देखील त्याने तक्रारदार यांना २५ गुंठे जागा २५ लाखांत विकली.

त्याचे खरेदीखत न करीता आर्थिक फसवणूक केली. खरेदी खत करायचे असेल तर आणखी ७० लाख रुपये खंडणी मागून ते न दिल्यास किंवा पोलिसांना याची माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याला घाबरून तक्रारदार यांनी बाबाराजेला पाच लाख रुपये दिले. या प्रकरणी बाबाराजेला शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे.

ज्यांनी पैसे बुडवलेत त्या ऊसतोडणी मुकादमांवर तातडीने कारवाई होणार! पोलीस प्रमुखांची माहिती..

मावळ तालुक्यातील बेबड ओव्हळमध्ये वनविभागाची पाच एकर जमीन आहे. या जमिनीवर कायदेशीर मार्गाने प्लॉटिंग होत नाही. परंतु तरीदेखील बाबाराजे देशमुख यांनी वनविभागाची २५ गुंठे जागा परस्पर विकली. देशमुख यांनी या व्यवहाराचं खरेदीखतही केलं नाही

आता मल्चिंग पेपरसाठी 50 टक्के अनुदान मिळणार, असा घ्या लाभ..

याच प्रकरणावरून अधिकाऱ्याने बाबाराजे यांना जाब विचारला असता त्यांनी अधिकाऱ्याला ७० लाखांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने या प्रकरणाची मावळ पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने बाबाराजे देशमुख यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत, त्यांनाही मिळणार! फक्त या शेतकऱ्यांना पुढचा हप्ता मिळणार नाही
आता रेशनकार्ड काढता येणार ऑनलाइन, एजंटची कटकट मिटली
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सर्वांचे अंदाज चुकवत मान्सून अंदमानसह बंगालच्या उपसागरात दाखल..

English Summary: Babaraj Deshmukh was arrested by the police, shocking information came to light..
Published on: 20 May 2023, 04:44 IST