Others News

आपण दैनंदिन आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टींसाठी ज्योतिषशास्त्राचा आधार घेतो. घरामध्ये कुठलेही शुभकार्य असेल तर आपण ज्योतिष शास्त्रानुसार विधी किंवा तारीख ठरवत असतो. बरेच जण असे आहेत की त्या कुठलीही गोष्ट करण्याअगोदर ज्योतिष शास्त्रानुसार करतात. ज्योतिषशास्त्राचे एक वेगळे स्वरूप असून काही नियम देखील आहेत.

Updated on 13 September, 2022 12:37 PM IST

 आपण दैनंदिन आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टींसाठी ज्योतिषशास्त्राचा आधार घेतो. घरामध्ये कुठलेही शुभकार्य असेल तर आपण  ज्योतिष शास्त्रानुसार विधी किंवा तारीख ठरवत असतो. बरेच जण असे आहेत की त्या कुठलीही गोष्ट करण्याअगोदर ज्योतिष शास्त्रानुसार करतात. ज्योतिषशास्त्राचे एक वेगळे स्वरूप असून काही नियम देखील आहेत.

जर आपण पैशांच्या संबंधित व्यवहारांचा विचार केला तर यासाठीदेखील ज्योतिष शास्त्रामध्ये काही दिवस आणि वेळ हे निश्चित करण्यात आले आहेत. याविषयी या  लेखामध्ये माहिती घेऊ.

नक्की वाचा:कसा जाईल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य काय सांगते...

 पैशांच्या व्यवहारासंबंधी ज्योतिषशास्त्राचे मत

 ज्योतिष शास्त्रामध्ये कर्जाच्या संबंधित काही नियम असून ते माहितीसाठी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपण दैनंदिन आयुष्यामध्ये अनेक प्रसंगांमध्ये आपल्याला उधार किंवा कर्जरूपाने पैसे घ्यायची वेळ येते. कुठल्याही प्रकारे घेतलेले पैसे  परत करावेच लागतात. परंतु बऱ्याचदा खूप प्रयत्न करून देखील आपण कर्जाची परतफेड करण्यासाठी सपशेल अपयशी ठरतो. या सगळ्या गोष्टींसाठी ज्योतिष शास्त्रामध्ये कारणे दिली आहेत ते आपण पाहू.

1- ज्योतिष शास्त्रानुसार रविवारी कुठल्याही प्रकारचे कर्ज घेणे टाळावे कारण सूर्यदेव ऋणी मानला जातो.

नक्की वाचा:Today Horoscope: आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यवान ठरण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

2- कर्ज घेताना आद्रा,ज्येष्ठ, विशाखा, कृतिका, ध्रुव,  मुल, रोहिणी इत्यादी नक्षत्र लक्षात ठेवावेत.

3-मकर संक्रांतीच्या दिवशी कधीही कर्ज घेऊ नये. कारण या दिवशी घेतलेले कर्ज परतफेड करणे दुरापास्त होते. तसेच त्रीपुष्कर आणि द्विपुष्कर योगात कर्ज घेऊ नये.

4- ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी चुकून देखील कर्ज देऊ नये. कारण या दिवशी जर कर्ज घेतले तर माणूस अधिकच कर्जाच्या खाईत अडकतो.

5- शनिवार, मंगळवार आणि रविवारी कुठल्याही प्रकारचे कर्ज घेऊ नये. या आठवड्याच्या तीन दिवसात तुम्ही कर्ज घ्याल तर नंतर परतफेड करण्यात अडचणी येऊ शकतात. परंतु कर्जाचा हप्ता भरण्यासाठी मंगळ सर्वात शुभ दिवस आहे.  या दिवसांमध्ये कर्ज फेडणे चांगले आहे परंतु घेणे नव्हे.

नक्की वाचा:कामाची बातमी! PF खात्यावर मिळणार पेन्शन; जाणून घ्या नियम आणि अटी

English Summary: avoid to take debt in some days and nakshatra by astrology
Published on: 13 September 2022, 12:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)