Others News

August Bank Holidays 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ऑगस्ट महिन्यासाठी बँक सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. स्वातंत्र्य दिन 2022, रक्षाबंधन, जन्माष्टमी 2022 आणि गणेश चतुर्थी 2022 यासह अनेक मोठे सण ऑगस्टमध्ये येत आहेत.

Updated on 01 August, 2022 3:19 PM IST

August Bank Holidays 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ऑगस्ट महिन्यासाठी बँक सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. स्वातंत्र्य दिन 2022, रक्षाबंधन, जन्माष्टमी 2022 आणि गणेश चतुर्थी 2022 यासह अनेक मोठे सण ऑगस्टमध्ये येत आहेत.

ऑगस्ट महिन्यात 2/4 शनिवार आणि रविवार वगळता बँका एकूण 18 दिवस बंद राहतील. अशा स्थितीत ऑगस्ट महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल, तर तुमची राज्याची सुट्टी पाहून त्यानुसार बँकेत जाण्याचा प्लॅन करा.

शनिवार व रविवारच्या सुट्यांव्यतिरिक्त सणांच्या दिवशीही बँका बंद असतात. यातील काही सण स्थानिक आहेत तर काही सणांवर देशभरातील बँका बंद असतात.

हे ही वाचा: Kisan Credit Card: काय सांगता! किसान क्रेडिट कार्डवर कमी व्याजात मिळणार कर्ज; जाणून घ्या व्याजदर

ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

1 ऑगस्ट: द्रुपका शे-जी उत्सव (फक्त सिक्कीममध्ये बँका बंद)

7 ऑगस्ट: पहिला रविवार (साप्ताहिक सुट्टी)

8 ऑगस्ट: मोहरम (फक्त जम्मू आणि काश्मीर बँका बंद)

९ ऑगस्ट: मोहरम

11 ऑगस्ट: रक्षा बंधन (देशभरात सुट्टी)

12 ऑगस्ट: रक्षाबंधन (कानपूर आणि लखनौ)

13 ऑगस्ट: दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)

14 ऑगस्ट : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

१५ ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन

16 ऑगस्ट: पारशी नववर्ष (मुंबई आणि नागपूरमध्ये सुट्टी)

18 ऑगस्ट: जन्माष्टमी (देशभर सुट्टी)

19 ऑगस्ट: जन्माष्टमी/कृष्ण जयंती (अहमदाबाद, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, गंगटोक, जयपूर, जम्मू, पटना, रायपूर, रांची, शिलाँग आणि शिमला)

20 ऑगस्ट: श्री कृष्ण अष्टमी (हैदराबाद)

21 ऑगस्ट : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

28 ऑगस्ट : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

29 ऑगस्ट: श्रीमंत शंकरदेव (गुवाहाटी) यांची पुण्यतिथी.

31 ऑगस्ट: गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँका बंद)

हे ही वाचा: पेन्शनधारकांसाठी खुशखबर! EPFO ​​ने सुरू केली ही नवीन सुविधा
हे ही वाचा: सोने खरेदीदारांसाठी सुवर्ण संधी! सोने 4700 रुपयांनी स्वस्त, पहा नवीन दर...

English Summary: August Bank Holidays 2022: Banks will be closed for 18 days in August
Published on: 01 August 2022, 03:19 IST