मुंबई- सुरक्षित व योग्य परतावा देणारी गुंतवणूक सर्वांना हवी असते. योग्य माहितीचा अभावामुळे गुंतवणुकीच्या माहितीपासून अनेकजण वंचित राहतात. खात्रीशीर गुंतवणूकीतुन उत्तम परतावा साठी पोस्ट ऑफिसच्या योजनांना अनेक जण पहिली पसंती देतात.
पोस्ट सेव्हिंग अकाउंट
पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग अकाउंट उघडणाऱ्या लाभार्थ्यांना वार्षिक 4 टक्क्यांनी व्याज दिलं जातं. केवळ 20 रुपये भरून कोणतीही व्यक्ती आपलं सेव्हिंग अकाऊंट उघडू शकते.
रिकरिंग अकाउंटमध्ये मात्र 8.4 टक्के व्याज दिलं जातं. ही योजना एप्रिल 2014 पासून लागू करण्यात आलीय. प्रत्येक महिन्याला कमीत कमी 10 रुपयांनी ही योजना तुम्ही सुरू करू शकता. जास्तीत जास्त रकमेची मात्र मर्यादा नाही. ही योजना पाच वर्षांसाठी आहे. या योजनेत तुम्हाला वार्षिक 8.4 टक्के व्याज मिळतं.
Published on: 22 September 2021, 09:43 IST