अटल विमाधारक व्यक्ती कल्याण योजनेचा लाभ आहात 30 जून 2021 पर्यंत घेता येणार होता परंतु आता सरकारने या योजनेची मुदत वाढवून 30 जून 2022 केली आहे. आता या योजनेचा लाभ 1 जुलै 2021 ते 30 जून 2022 पर्यंत घेता येणार आहे.
काय आहे ही योजना?
सरकार या योजनेच्या माध्यमातून नोकरी गेलेल्या बेरोजगारांना भत्ता देणार आहे.तीन महिना कालावधीपर्यंत बेरोजगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.तीन महिन्यातील एकूण पगाराच्या सरासरी 50 टक्के दावा या योजनेद्वारे करता येऊ शकतो. या योजनेचा लाभ बत्तीस दिवसात मिळतो.या योजनेद्वारेएका लाभार्थ्याला फक्त एकदाच लाभ घेता येतो.परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अट आहे की,संबंधित व्यक्ती तीन महिन्यापासून बेरोजगार असायला हवा.
या योजनेचा लाभ कुणाला मिळतो?
1-जी व्यक्ती देशातील एखाद्या खाजगी क्षेत्रात नोकरी करत असेल.
2- संबंधित व्यक्तीचे तो काम करत असलेल्या कंपनीकडून जर पीएफ/ईएसआय कपात होत असेल अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
3-या योजनेचा लाभ घेण्यासाठी बेरोजगार मागील 78 दिवसांपासून बेरोजगार असायला हवा.
या योजनेचा लाभ कसा घ्यावा?
ईएसआय शी संबंधित कर्मचारी या विभागातील कुठल्याही शाखेत जाऊन अर्ज सादर करू शकतात.अर्ज सादरकेल्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी केली जाते व पात्र असलेल्या अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा केले जातात.
Published on: 13 September 2021, 11:33 IST