मित्रांनो सरकारी नौकरदार व्यक्तींना रिटायर्ड झाल्यानंतर पेन्शन भेटते आणि त्यामुळे त्यांचा म्हातारपणी उदरनिर्वाह सहजरीत्या भागतो. पण असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना असला कुठलाही लाभ भेटत नाही म्हणुन त्यांना गुंतवणूक हि करावी लागते. आज आपण अशाच एका गुंतवणूकिची योजनेविषयी जाणुन घेणार आहोत.
आम्ही ज्या योजनेविषयी बोलतोय त्या योजनेचे नाव आहे अटल पेन्शन योजना, हि एक सरकारी योजना आहे त्यामुळे हि पूर्णतः सुरक्षित आहे. हि योजना खासकरून व्यक्तीच्या म्हातारपणी उदरनिर्वाह सुरळीत व्हावा ह्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरु केली होती. ह्या योजनेद्वारे नागरिकांना एक फिक्स पेन्शन पुरविले जाते. पेन्शन हे 1000 रुपयापासून ते 5000 रुपयापर्यंत मिळू शकते हे पूर्णतः गुंतवणूकवर अवलंबून असते. चला तर मग मित्रांनो याविषयीं जाणून घेऊया अधिक माहिती.
ह्या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी पात्रता नेमकी काय
अटल पेन्शन योजना ह्या सरकारी योजनेत, गुंतवणूक करण्यासाठी काही पात्रता आपण जाणुन घेऊया,
»गुंतवणूक करणारा व्यक्ती हा भारतीय नागरिक असावा.
»ह्या योजनेत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या व्यक्तीचे वय हे 18 ते 40 दरम्यान असावे.
»ह्या योजनेत भारतातील कोणताही नागरिक गुंतवणूक करू शकतो, पण विशेषता हि योजना असंघटित कामगार व मजूर वर्गासाठी सुरु करण्यात आली आहे.
नेमकी काय आहे अटल पेन्शन योजना
जर आपणांसहि ह्या अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला गुंतवणूक हि 42 वर्षापर्यन्त करावी लागेल हे लक्षात घ्या. जर अर्जदार 18 वर्षांचा असेल तर प्रत्येक महिन्याला 210 रुपये प्रीमियम भरावा लागेल. तसेच दरमहा 1000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी वयाच्या 18 वर्षाच्या व्यक्तीस फक्त 42 रुपये महिन्याला द्यावे लागतील. जर गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू वयाच्या 60 वर्षापूर्वी झाला, तर या योजनेचे पैसे त्या गुंतवणूकदाराच्या नामनिर्देशित व्यक्तीला दिले जातील. 42 वर्षापर्यंत एकूण गुंतवणूक हि एक लाख चार हजार एवढी बनते. आपणास 60 वर्षानंतर ह्या योजनेचा लाभ हा मिळतो, आपल्याला 60 वर्षानंतर1000 रुपयापासून ते 5000 रुपययापर्यंत पेन्शन हि दिले जाते.
ह्या योजनेत एका व्यक्तीचे एकच खाते बनू शकते. ह्या योजनेला सरकारने टॅक्स फ्री बनवले आहे. सुरवातीचे 5 वर्ष सरकारद्वारे योगदान राशीं देखील गुंतवणूक करणाऱ्या मव्यक्तीला दिले जाईल.
कसं खोलायचं योजनेसाठी खाते
जर आपणांस ह्या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला एक खाते उघडावे लागेल, यासाठी ज्या बँकेत आपले सेविंग अकाउंट आहे त्या बँकेत जाऊन APY म्हणजेच अटल पेन्शन योजना नोंदणी फॉर्म हा भरावा लागेल. फॉर्म सोबत आधार नंबर आणि मोबाईल नंबर द्यावा लागेल. हि सर्व प्रोसेस केल्यानंतर बँक खात्यातून दर महिन्याला तुमचा हप्ता आपोआप कापला जाईल.
Published on: 24 November 2021, 07:26 IST