अटल पेन्शन योजना (Atal pension scheme) ही आर्थिक स्थिती मागासलेल्या लोकांसाठी सुरु करण्यात आली होती. जे ग्राहक अटल पेन्शन योजना एपीवायमध्ये नियमित कॉन्ट्रिब्यूट करतात त्यांना सरकारने दिलासा दिलासा दिला आहे. कोरोना व्हायरसच्या कहरामुळे पेन्शन योजनेत कॉन्ट्रिब्यूट करण्यास ३० जून पर्यंत सूट दिली. या योजनेचे अधिकतर लाभार्थी कमी उत्पन्न गटातील शेतकरी मजूर वर्गातील आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचा परिणाम या वर्गावर पडणार आहे.
पेन्शन फंड नियामक (PFRDA) ने यासंदर्भात एक निवदेन जारी केले आहे. त्याच्यानुसार, सध्या देशात असलेल्या परिस्थितीत नियमीत गुंतवणूक करणे कठीण असल्याने या योजनेतील ऑटो डेबिट सुविधेला बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३० जून पर्यंत या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांच्या खात्यातून कॉन्ट्रिब्यूशन रक्कम कापली जाणार नाही. यासह जे अटल पेन्शन योजनेचे खातेधारक आहेत पण आपल्या खात्यात पैसे कापले जात नसतील म्हणजे नॉन- डिडक्टेट एपीवाय कॉन्ट्रिब्यूशनला नियमित एपीवाय कॉन्ट्रिब्यूशनसह एक जुलै २०२० ते ३० सप्टेंबर २०२० च्या दरम्यान जमा करतात. तर त्यांना दंडात्मक व्याज लागणार नाही. अटल पेन्शन योजना सरकारी योजना असून ही पेन्शन देण्याची हमी देते. मुख्यत ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आहे.
एपीवायसह (APY) पीएफआरडीए नॅशनल पेन्शन योजनाही चालू आहे. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना पेन्शन देत असते. अशा सेक्टरमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी आणि इतर संस्थेत काम करणारे कर्मचारी. कोविड -१९ (covid-19) च्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात पीएफआडीए ने एनपीएस सब्सक्राइबरांना खात्यात जमा रक्कमेतून एक तृतीयांश काढण्यास मंजुरी दिली होती. ३१ मार्च २०२० पर्यंत एनपीएस आणि एपीवायच्या अंतर्गत सब्सक्राइबरांची संख्या ३.४६ कोटी होती. यात एपीवाय सब्सक्राइबर २.११ कोटी होते. मार्च २०२० पर्यंत या योजनेच्या एकूण अॅसेट अंडर मॅनेजमेंट ४.१७ कोटी रुपये होते. यात एपीवायची रक्कम १० हजार ५२६ कोटी रुपये होती.
Published on: 15 April 2020, 12:37 IST