Others News

अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) (APY) ही भारत सरकारकडून चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे. या योजनेचे नियमन पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅंड डेव्हलपमेंट ऑथोरिटी (PFRDA)कडून केले जाते. ज्यांना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन हवे आहे अशा व्यक्तींसाठी अटल पेन्शन योजना हा एक चांगला पर्याय आहे.

Updated on 18 May, 2021 8:58 PM IST

अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) (APY) ही भारत सरकारकडून चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे. या योजनेचे नियमन पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅंड डेव्हलपमेंट ऑथोरिटी (PFRDA)कडून केले जाते. ज्यांना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन हवे आहे अशा व्यक्तींसाठी अटल पेन्शन योजना हा एक चांगला पर्याय आहे. अटल पेन्शन योजनेचे व्यवस्थापन पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅंड डेव्हलपमेंट ऑथोरिटी (PFRDA)कडून करण्यात येते आणि ही योजना १८ ते ४० वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी आहे. या योजनेत वयाच्या ६०व्या वर्षांपर्यत नियमित गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर एक निश्चित रकमेचे पेन्शन सुरू होते.

अटल पेन्शन योजनेतील गुंतवणूक

या योजनेत तुम्हाला दर महिन्याला, तिमाही स्वरुपात किंवा सहामाही स्वरुपात गुंतवणूक करता येते. दरमहा १,००० रुपये ते ५,००० रुपयांचे पेन्शन मिळवण्यासाठी खातेधारकाने दरमहा ४२ रुपये ते २१० रुपयांची गुंतवणूक केली पाहिजे, जर त्याने वयाच्या १८ वर्षी गुंतवणूक सुरू केली तर. एरवी जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या ४० वर्षी या योजनेत गुंतवणूक सुरू केली तर त्याला दरमहा २९१ रुपये ते १,४५४ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
योजनेतील गुंतवणूक

दरमहा ३,००० रुपयांचे निश्चित पेन्शन मिळवण्यासाठी १८ ते ३९ वर्षे वयोगटातील व्यक्तीला दरमहा १२६ ते ७९२ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या गुंतवणुकीतून ५.१ लाख रुपयांची रक्कम जमा होईल. तर दरमहा ४,००० रुपयांचे निश्चित पेन्शन मिळवण्यासाठी १८ ते ३९ वर्षे वयोगटातील व्यक्तीला दरमहा १६८ ते १,०५४ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या गुंतवणुकीतून ६.८ लाख रुपयांची रक्कम जमा होईल. तर दरमहा ५,००० रुपयांचे निश्चित पेन्शन मिळवण्यासाठी १८ ते ३९ वर्षे वयोगटातील व्यक्तीला दरमहा २१० ते १,३१८ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या गुंतवणुकीतून ८.५ लाख रुपयांची रक्कम जमा होईल.

६०,००० रुपयांचे वार्षिक पेन्शन मिळवण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल?
१८ वर्षे - दरमहा २१० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच वार्षिक गुंतवणूक २,५२० रुपयांची असेल. वयाच्या ४२ वर्षांनंतर एकूण गुंतवणूक १,०५,८४० रुपयांची असेल. खातेधारकाला दरमहा ५,००० रुपयांचे पेन्शन मिळेल तर नॉमिनीला ८.५ लाख रुपये मिळतील.

 

२५ वर्षे - दरमहा ३७६ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तर वार्षिक गुंतवणूक ४,५१२ रुपयांची असेल. ३५वर्षांनंतर गुंतवणुकीची रक्कम १,५७,९२० रुपये असेल. यातून दरमहा ५,००० रुपयांचे पेन्शन मिळेल. तर नॉमिनीला ८.५ लाख रुपये मिळतील.

३० वर्षे - दरमहा ५७७ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तर वार्षिक गुंतवणूक ६,९२४ रुपयांची असेल. ३०वर्षांनंतर गुंतवणुकीची रक्कम २,०७,७२० रुपये असेल. यातून दरमहा ५,००० रुपयांचे पेन्शन मिळेल. तर नॉमिनीला ८.५ लाख रुपये मिळतील.

३९ वर्षे - दरमहा १,३१८ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तर वार्षिक गुंतवणूक १५,८१६ रुपयांची असेल. २१ वर्षांनंतर गुंतवणुकीची रक्कम ३,३२,१३६ रुपये असेल. यातून दरमहा ५,००० रुपयांचे पेन्शन मिळेल. तर नॉमिनीला ८.५ लाख रुपये मिळतील.

 

अटल पेन्शन योजना पात्रता

ही एक सामाजिक सुरक्षितता योजना आहे. या योजनेद्वारे १,००० रुपये ते ५,००० रुपयांपर्यतचे पेन्शन गुंतवणुकीच्या रकमेच्या आणि कालावधीच्या आधारावर दिले जाते. १८ ते ४० वर्षे वयोगटातील सर्व भारतीय नागरिकांसाठी ही योजना खुली आहे. या योजनेअंतर्गत २० वर्षांचा किमान गुंतवणूक कालावधी आवश्यक आहे. शिवाय तुमचे आधार कार्ड तुमच्या बॅंक खात्याशी लिंक असले पाहिजे.

अटल पेन्शन योजनेतील करवजावटीचे लाभ

अटल पेन्शन योजनेत केलेली गुंतवणूक प्राप्तिकर अधिनियम १९६१च्या कलम ८०सीसीडीअंतर्गत करवजावटीस पात्र आहे. या योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षात कमाल रक्कम २ लाख रुपयांवर करवजावट मिळते. शिवाय ८० सी आणि ८०सीसीडी अंतर्गत एकत्रितरित्या गुंतवणुकीची कमाल मर्यादा २ लाख रुपये आहे.

 

नियमित गुंतवणूक न केल्यास दंड

जर एखादी व्यक्ती अटल पेन्शन योजनेत ठरलेल्या गुंतवणूक कालावधीप्रमाणे नियमित गुंतवणूक करू शकली नाही तर दंड भरावा लागतो. १०० रुपयांच्या गुंतवणुकीवर दरमहा १ रुपयांचा दंड आकारला जातो. म्हणजेच १००० रुपयांची दरमहा गुंतवणूक करायची असल्यास आणि ती न झाल्यास १०० रुपयांवर १ एक रुपयाप्रमाणे १० रुपये दरमहा दंड आकारला जाईल.

English Summary: Atal Pension Scheme: Get a pension of Rs. 60,000 with a small investment
Published on: 18 May 2021, 08:58 IST