Others News

मुंग्या झेड दर्जाची सुरक्षा यंत्रणा वापरतात, यात आपल्याला नवल वाटल्याखेरीज राहणार नाही.

Updated on 02 August, 2022 4:34 PM IST

मुंग्या झेड दर्जाची सुरक्षा यंत्रणा वापरतात, यात आपल्याला नवल वाटल्याखेरीज राहणार नाही. अहो आपले पूर्वज खूपच शास्त्रोक्त पद्धतीने सण साजरे करीत होते, अलीकडे त्याला गालबोट लागेल अशी कृत्ये होताना दिसतात. कीटकांच्या जगात अनेक बदल होत गेलेत. यात जनुकीय ते शाररीक असे अनेक बदल घडत गेले आहे. शिवाय घडताना आपण पाहतोय. वास्तविक अनेक सण साजरे करताना त्यापाठीमागे अनेक हेतू असतात, शिवाय त्याला

निसर्ग संवर्धनाची जोड असते.There is a connection to nature conservation.आजकाल कुठल्याही बाबतीत अभ्यास नसताना अनेकजण लिहित असतात शिवाय समाजासमोर बोलत असतात. मात्र याचे गंभीर परिणाम निसर्गातील विविध वन्यजीवनावर होत असतात. नागपंचमी साजरी करताना आपण सर्वांनी या सणाचे शास्त्र समजून घेणे गरजेचे आहे.नागपंचमी साजरी कराच मात्र का ते नक्की वाचावे ...जैवविविधतेला वाचविण्याची नागपंचमी....नागपंचमी नक्कीच साजरी झाली पाहिजे पण कशी.....साजरी करण्याचे मूळ कारण

म्हणजे वारुळे, मुंग्या, सापांना संरक्षण देण्याच्या उदेशाने पूर्वजांनी सुरु केलेली नागपंचमी, नागपंचमी म्हटलं कि समोर येतो नागोबा आणि त्यांचे वारूळ, पूर्वजांनी आपल्याला श्रावण किवा आगष्ट महिन्यात सुरु असलेली नागपंचमीसाठी खूप चांगल्या रूढी परंपरा आखून दिल्या आहेत. मात्र यात आजचा शिक्षित पण बिनडोक मानव यातून काहीच बोध घेताना दिसून येत नाही. आपण नागपंचमी सन साजरा करताना आजही नागाची पूजा करतो. पूर्वी

लोक मातीचे नाग करून त्याची पूजा करायचे आणि हा मातीचा नाग वारुळापुढे ठेऊन करीत असत. आपण याबाबत सविस्तरपणे माहिती घेतल्यास असे लक्ष्यात येईल कि मुंग्या व वाळवी खूप वेगवेगळ्या प्रकारची वारुळे बांधतात अगदी किल्लेच तयार करतात. हे किल्ले अर्थात वारुळे तयार करताना आपल्या तोडतील आम्लयुक्त लाळेचा उपयोग करून जमिनिखालील मातीचा प्रत्येक कण आणि कण

उकरून वरील बाजूस आपल्याला दिसणारे वारूळ तयार करतात, मात्र वारूळ हे जमिनीच्या खोलवर असते तेवढेच जमिनीच्या वर असते हे लक्ष्यात ठेवावे. आता पावसाळ्यात चुकून जर वारुळाची माती वाहिली तर या मातीच्या नागाची माती वापरून मुंग्या डागडुजी करतात, म्हणून मातीचा नाग लोक करायचे. या वारुळात साप कधीतरी राहतो आणि मग शेतकरी किवा एखादा वाटसरू अशी घटना

पाहतो आणि मग हे वारूळ नागाचे किवा सापाचे आहे असे जगजाहीर केले जाते. आयत्या बिळात नागोबा अशी जुनी म्हण रूढ आहे, म्हणजेच या म्हणीत सर्व शास्त्र लपलेले आहे, वारूळ आहे मुंग्यांचे मात्र राहतो नागोबा, याचाच फायदा घेत आपल्या पूर्वजांनी नागपंचमी सण सुरु करून एकाचवेळी दोन जिवांना जीवदान दिल्याचे दिसून येते.

सापांचे जगभरात जवळपास ३००० प्रकार आहेत, यातील भारतात २७५ पेक्षा अधिक जातीचे साप सापडतात. यातील ५० ते ५५ प्रकारचे साप विषारी शिवाय यातील ४० प्रजाती समुद्रात सापडतात, तर उर्वरित साप बिनविषारी आहेत. उंदीर एक जोडी वर्षात ८०० उंदीर निर्माण करीत असते. तर एक साप दिवसाला एक उंदीर खात असतो. जगभरातील १००

किलो अन्न तयार होताना त्यातील उंदीर जवळपास २६ किलो अन्न नासाडी करतो, मग विचार करा, साप किती फायदेशीर आहेत. सापांना घाबरू नये म्हणून तर नागपंचमी. त्याबद्दल चर्चा, माहिती जाणून घेणे हेच तर उद्दिष्ट.नेमके पावसाळ्यात अश्या काही वारुळात पाणी शिरते आणि मग नागोबा प्रत्यक्ष बाहेर पडतात, शिवाय इतरही साप बसण्याच्या जागेत पावसाचे

पाणी जाते आणि मग बहुतांश वेळा साप रत्यावर किंवा घराच्या कडेला आसरा घेतात, यात साप मारले जाऊ नयेत म्हणून पूर्वजांनी नागपंचमी सन साजरा करण्याचे मोठे शास्त्र जगापुढे निर्माण करून ठेवले असावे. असा सहज अंदाज बांधता येतो.सर्वात महत्वाचे म्हणजे पावसाळ्यात मुंग्या काम करत नाहीत, याला कारण हि तसेच आहे. आकाराने

छोटी असणारी मुंगी पावसाच्या पाण्यात वाहून जातात, त्यामुळे पावसाळ्यात वारुळाच्या लांब जाऊच शकत नाहीत, परिणाम अन्न कमी पडू शकते, मग अश्यावेळी आपण थोड अन्न दिले तर उत्तमच. शिवाय साप दुध पीत नाही किवा शाकाहार करीत नाही हेही त्यांना पक्के माहित होते. मात्र तरीही त्यांनी वारुळापुढे लाह्या, साखर, बत्ताशे,

पदार्थ वारुळापुढे ठेवले जातात, हे तर सर्व अन्न फक्त मुंग्यांचे आहे. म्हणजे पावसाळ्यात मुग्याना खाद्य मिळावे म्हणून हि तजबीज केल्याचे दिसून येते. शिवाय सापांना व त्यांचा पिल्लांनाहि जीवदान देण्याचे महत्वाचे काम या सणातून होत असते. मात्र शिकेलेली पिढी हुकल्यासारखी करायला लागली आणि त्याला घाणेरडे स्वरूप येऊन सापांची वरात काढणे तर कुठे प्रत्यक्ष पूजा करणे तर कुठे त्याला दुध

पाजणे असले आडानी प्रकार शिक्षित समाजात जास्त फोफावत गेले, परिणामी सण बाजूला आणि नको त्या भानगडी समाज्यासमोर येऊ लागल्या. त्यामुळे यापुढे फक्त वारुलांची पूजा करून त्याठिकाणी शाकाहारी निवद ठेवल्यास निसर्ग संवर्धन होणे शक्य होईल. लाखो मुग्यांचे वारूळ नष्ट करू नये हि पवित्र भावना.झेड सुरक्षा यंत्रणा म्हणजेच आपल्या वारुळात नागाला यायला परवानगी देणे, शिवाय नागाला अंडी

घालायला सुद्धा परवानगी देणे, बदल्यात नाग वारुळात येणे म्हणजे कोणत्याही जीवाची सहजासहजी वारुळाकडे बघण्याची धमक सुद्धा होणार नाही. अगदी अनेक उंदीर वारुळात येऊन मुंग्यांचे अन्न चोरून खात असतो, त्यालाही जरब बसण्यासाठी अशी यंत्रणा विकसित करणे मुग्याना विकसित करणे गरजेचे आहे. नाग किंवा इतर सापांचा मुंग्यांना कसलाही त्रास नाही, उलट सापामुळे वारुळाचे संरक्षण होत असते. मग इथ

सगळा किफायतशीरपणाच मुंग्यांनी स्वीकारला आहे.एका वारुळात जवळपास १० ते ४० लाख मुंग्या असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात एक वारूळ जीव सांभाळत असते, मग याला नष्ट केले तर मग किती गंभीर बाब आहे, आजकालच्या पिढीला जेसीबी मशीनने आपल्या शेतातील अनेक वारुळे नष्ट करताना मी पहिले, अर्थात हे त्यांना समजून सांगणे गरजेचे आहे. अर्थात शेती व वन विभागाला याबाबतीत समजणे गरजेचे आहे, अन्यथा हेच दोन

विभाग वारुळे नष्ट करायला सांगतात, कारण वाळवी मुळे झाडे व पिके मरतात, अशी मूर्खपणाची संकल्पना यांची आहे. खरतर जिथ वारुळे जास्त तिथली माती सुपीक जास्त. वाळवी व मुंग्या वारुळे बांधतात, शिवाय कमी वेळेत खतनिर्मिती करणारी निसर्गातील अश्या कीटकांची प्रणाली वाढली तरच आपण आरोग्यदायी जीवन जगू शकतो. कारण निसर्गात कुजणे या प्रक्रियेत मुंग्या व वाळवी अत्यंत

वेगाने आपापले काम करीत असतात. शिवाय साप नसतील तर मग उंदीर आपले जग अत्यंत वेगाने पसरत, मानवी जीवन सुद्धा धोक्यात आणू शकतात. हे विसरून चालणार नाही.इथ बोरी व बाभळीच्या अनेक झाडांना मुंग्या झेड सुरक्षा यंत्रणा पुरवितात, अनेक बोरी व बाभळीची झाडे याबाबतीत अश्या कीटकांना आपल्या शरीरातील गोड रस अर्थात डीकासारखा चिकट स्त्राव

पुरवितात. सर्व फांद्यावर दिवसभर फिरत फिरत संरक्षण करीत असतात, कुठलाही प्राणी अंग घासण्यासाठी गेल्यास अथवा मानव तोडण्यासाठी गेल्यास, मुंग्या त्यांचा अंगावर पडून कडकडून चावा घेऊन, शत्रूला पळवून लावतात.अर्थात सापांना व मुंग्यांना वाचविणे हे महत्वाचे कार्य कालच्या पूर्वजांनी खूप कल्पकतेतून केले आहे, आपणही पुढे हा वसा चालू ठेवूयात. फक्त मातीच्या

नागाची पूजा करावी, नक्कीच....सर्वांना एक विनंती आहे कि मांज्या असलेली दोरीने पतंग उडवू नयेत, अनेक निष्पाप जीव जातात अगदी पक्षी, वटवाघळे आणि माणससुद्धा !!आपल शरीर निरोगी राह्नेसाठी पंचमी......मेंहदी आणि नागपंचमी यात मेंहदी शरीरातील उष्णता शोषून घेत असते शिवाय त्वचा स्वच्छ करण्याचे काम

करीत असते, मात्र मेंहदी आपल्या घरासमोरील झाडाची असली पाहिजे, कोणतेही रसायन घातले नसावे. कारण हाताला लावलेली मेहंदी शेवटी हळूहळू पोटात जाते आणि बरेच आजार कमी करीत असते अगदी अनेक प्रकारचे शरीरातील तापासारखे आजार कमी करीत असते.   

 

डॉ. महेश गायकवाड, पर्यावरण तज्ञ, M.Sc. Ph.D. - Environment Science 

बारामती. फोन. ९९२२४१४८२२ 

निसर्ग प्रेमी ,सर्प् मित्र 

English Summary: “Ants” who use and provide security of Nagpanchami ants and snakes, in fact Z Plus?
Published on: 02 August 2022, 04:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)