तसेच पांढरा मावा ज्याला गोडवा असतो. त्याचेही त्या वहन अथवा संग्रह करत असतात. फक्त पांढर्या माव्याला वाहून नेतात म्हणून त्यांना उपद्रवी मानले जाते.पण हे चूक आहे. मुळातच पांढरा मावा का लागतो याच्या मुळाशी गेले पाहिजे.
तर आपण जेव्हां बाग तयार करतो. गच्च मातीने कुंडी भरली असेन तर कालांतराने त्यातील माती अधिक घट्ट होते. वनस्पतीचे काही मुळ वाळून जातात. अशा रिकाम्या कुंडीला बराच काळ पाणी दिलेले नसते. अशा वेळेस त्या मुळांभोवती असलेली साखर गोळ करतात. व तेथेच अन्न व सुरक्षा मिळाल्यामुळे तेथे अंडी घालतात.
बरेचदा कुंडीत झाड जिवंत असले व पुरेसे पाणी, त्यात वाफसा नसेल अशा वेळेसही त्यात मुंग्या कोरड्या जागेत आपले घर तयार करतात. कारण पुरेशा पाण्याअभावीसुध्दा वनस्पतीच्या मुळ्या तेथे वाळलेल्या असतात. खरं तर कुंड्यांना, बागेला पाणी नसणे,विलंब होणे हे सुचवण्याचे काम मुंग्या करत असतात. त्यामुळे बागेला कुंड्याना पाणी दिले की लगेच मुंग्या गायब होतात. मुग्या या विशेषतः माती उकरण्याचे वर खाली करण्याचे विना पैशानी काम करतात. त्यामुळे त्यांना मित्र किटक मानले जाते. मुंग्या या पाणी जमीनीखाली पाणी शोधणार्या संशोधक असतात. जमीनीखाली पाण्याचा योग्य साठा असल्यास त्या ठिकाणी ते वारूळ बनवतात. एका रांगेत वारूळ असलेल्या रेषेत पाण्याचा भूमीगत साठा असतो. त्यामुळे त्यांना मारू नये. वाळवीला खाण्याचे काम मुंग्या करतात. त्यामुळे त्याही दृष्टीने ते आपले मित्र किटक आहेत.
मुंग्याना मारण्यासाठी अनेक रासायनिक उपाय आहेत. पण मुंग्या मारू नये.. त्यांना दूर करावे. त्यासाठी बागेत, वेखंडाची पावडर मिळते. ती चिमूटभर टाकल्यास त्या गायब होतात.
तसेच पावाचा तुक़डा ठेवल्यास त्यास असंख्य मुंग्या लागतात. एकदा का त्यांचा पावावर हल्ला झाला की तो पाव उचलून बाहेर फेकून देवू शकतात.
आपण नेहमीच बागेत काम करत असाल तर मुंग्या तुम्हाला चावणार नाही. कारण त्यांना आपला गंध माहित असतो. किंवा त्यांचा एवढा त्रास होत नाही. शिवाय मधमाशा, मुंग्या या बिनविषारी असतात.
त्या चावल्या तर खूप काही त्रास होत नाही. चावल्या तर त्यावर कांद्याचे साल चोळावे खाजवेची तिव्रता कमी होते.
शरद केशवराव बोंडे
जैविक शेतकरी
९४०४०७५६२८
प्रतिनिधी गोपाल उगले
Published on: 30 August 2021, 10:44 IST