Others News

सध्या विदर्भात उन्हाच्या झळा जाणवत आहेत, प्रत्येकाला प्रवासात तहान लागते पण प्रत्येकाकडे पाणी असेलच असे नाही अशा वेळी तहानलेल्या वाटसरुची तहान भागवण्यासाठी येतात ते वॉटरमॅन राजू चर्जन, राजू चर्चेन हे अमरावती जिल्ह्यातील बासलापूर गावातले एक अल्पभूधारक शेतकरी आहेत.

Updated on 04 May, 2022 11:05 AM IST

सध्या विदर्भात उन्हाच्या झळा जाणवत आहेत, प्रत्येकाला प्रवासात तहान लागते पण प्रत्येकाकडे पाणी असेलच असे नाही अशा वेळी तहानलेल्या वाटसरुची तहान भागवण्यासाठी येतात ते वॉटरमॅन राजू चर्जन,

राजू चर्चेन हे अमरावती जिल्ह्यातील बासलापूर गावातले एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या बासलपूरनजिक तुम्ही कधी गेलात तर  तुम्हाला हा दुचाकीवरचा वॉटरमॅन पाहायला मिळेल.

उन्हातान्हाचं प्रवासात असलेल्या तहानलेल्या प्रत्येक वाटसरूसाठी हा वॉटरमॅन ग्लासभर थंडगार पाणी पाजतो. राजू चर्जन गेल्या 20 वर्षांपासून हे काम करत आहेत. विशेष म्हणजे यासाठी ते कुठलेच पैसे घेत नाही.

दररोज सकाळी आपल्या शेतीची सगळी कामं आटोपून दुपारी घरी यायचं, अंघोळ करायची अन दोन घास पोटात टाकून तहानलेल्यांना पाणी पाजण्यासाठी बाहेर पडायचं. राजू हे काम गेल्या २० वर्षापासून करत आहेत. 'मोबाईल वॉटरमॅन' म्हणून ओळखले जाणारे राजू हे त्यांच्याकडे असलेल्या ४ पिशव्या आणि २० बाटल्यांमध्ये थंड पाणी भरून या थंडगार पाण्याच्या पिशव्या दुचाकीला बांधून जवळपास किमान ३० किलोमीटर पर्यंत ते पाणी वाटप करण्याचे काम करतात.

त्यांच्या प्रवास मार्गात  रस्त्यात नजरेस पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपुलकीने ते एक ग्लास पाणी पाजतात.  ते वर्षातील तीनही ऋतूमध्ये हे काम करतात.

प्रवासात आढळणाऱ्या मजुरांना झाडाखाली थांबून ते आवर्जून ग्लासभर पाणी देतात. आज पेट्रोल महागले आहे तरीही ते दुचाकीच्या पेट्रोलचेही पैसेही आपल्याच खिशातून देतात ते पैसै स्वीकारत नाहीत. चर्जन सांगतात, " ग्लासभर  पाण्याची किंमत ही तहानलेल्या व्यक्तीलाच कळू शकते.

त्यांच्यावर एकदा अशी वेळ आली होती असे ते सांगतात. प्रवास करत असताना, माझ्या एक वर्षाच्या मुलाला तहान लागली होती. तो रडत होता. पण तो का रडत आहे समजत नव्हते. त्यावेकी माझ्याकडे पाणी नव्हतं. त्यावेळी काही काळ पायी प्रवास केला त्यानंतर त्यांना एक घर दिसले तेथून त्यांना थोडे पाणी मिळाले ते मुलाला पाजले व मुलगा शांत झाला आणि त्याचं रडणं थांबलं. तेव्हापासून मनाशी निश्चय केला आणि मोबाईल पाणपोई' सुरू केली. त्यांचे हे पुंण्याचे काम असेच चालू राहो, याबाबत बीबीसी मराठीने वृत्त प्रसारित केले आहे.

महत्वाच्या बातम्या
ड्रोन खरेदी आता होणार सोपी; सरकारकडून मिळणार भरघोस अनुदान
IPO : गुंतवणूकदारांना फायदाच फायदा; लवकरच 9 कंपन्यांचे आयपीओ येणार

English Summary: Angel of Amravati, angel for the thirsty
Published on: 04 May 2022, 11:05 IST