Others News

समाजात बरेच जण एखादा जमिनीचा तुकडा घेऊन त्यावर का बांधतात किंवा तयार फ्लॅट किंवा घर खरेदी करतात. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की, गृहकर्ज आणि घर बांधण्यासाठी घेत असलेल्या जमिनीवरील कर्ज हे वेगळे आहेत.जर तुम्हाला जमिनीवर कर्ज घ्यायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरेल.

Updated on 13 December, 2021 7:12 AM IST

समाजात बरेच जण एखादा जमिनीचा तुकडा घेऊन त्यावर का बांधतात किंवा तयार फ्लॅट किंवा घर खरेदी करतात. यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की, गृहकर्ज आणि घर बांधण्यासाठी घेत असलेल्या जमिनीवरील कर्ज हे वेगळे आहेत.जर तुम्हाला जमिनीवर कर्ज घ्यायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरेल.

 जमिनीवर कर्ज कोणाला मिळू शकते?

1-भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती गृहकर्ज आणि जमीन कर्ज घेऊ शकते.

2- अनिवासी भारतीयांना गृह कर्ज मिळू शकते पण त्यांना जमिनीवर कर्ज  मिळू शकत नाही.

  कर कपातीचा दावा

  • गृहकर्जाच्या मुद्दलाची परतफेड केल्यावर आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत आणि व्याजाच्या परतफेडीवर कलम 24 बी अंतर्गत कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो.
  • परंतु जमिनीवरील कागदावरचा कोणताही कर लाभ उपलब्ध नाही.

 कोणत्या प्रकारचे मालमत्ता मिळू शकते?

  • कर्ज देण्याचे नियम सोपे व लवचिक आहेत.
  • जमिनीवर देण्यात येणारे कर्ज फक्त विशिष्ट प्रकारच्या जमिनीसाठी उपलब्ध असते.
  • कर्ज देणारे कर्जदार सामान्यतः विकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या जमिनीना निधी देणे पसंत करतात.

जमीन वापराची स्थिती

1-जमिनीवर कर्ज मिळताना जमिनीच्या वापराचे स्थिती महत्त्वाचे आहे.

2-कर्जदार निवासी जमिनीसाठी कर्जदेणे पसंत करतात.

  • शेती किंवा व्यवसायिक जमीन खरेदीसाठी जमीन कर्ज उपलब्ध नाही.
  • काही विशेष कर्जाचा वापर शेतजमीन खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो परंतु हे कर्ज सहज उपलब्ध होत नाहीत.
  • ही कर्जे फक्त काही विशिष्ट कर्जदारांसाठी आहेत जसे की सीमांत शेतकरी किंवा भूमिहीन मजूर
  • महापालिका क्षेत्राबाहेरील मालमत्तेसाठी गृह कर्जही घेता येते.
  • जमीन किंवा औद्योगिक क्षेत्रातील जमिनीवर सामान्यतः जमीन कर्ज उपलब्ध नसते.ती जमीन महानगरपालिका किंवा महापालिका हद्दीत असावी आणि जमिनीचे स्पष्टपणे सिमांकनही केले पाहिजे.

जास्तीत जास्त किती कर्ज मिळेल?

  • गृहकर्जाच्या बाबतीत मालमत्तेच्या मूल्याचा 90 टक्केपर्यंत कर्ज मिळू शकते.
  • जमिनीच्या कर्जसाठी कर्जाची रक्कम कमी आहे. मालमत्तेच्या किंमतीच्या 70 टक्के ते 75 टक्के पर्यंत कर्ज दिले जाते.हा निधी फक्त जमीन खरेदी साठी असतो.
  • जर कर्ज अर्जदाराला जमीन खरेदी आणि बांधकाम कर्ज मिळाले तर अधिक कर्ज उपलब्ध होते.
  • अर्जदाराने डाऊन पेमेंट साठी कमीत कमी 30 टक्के किंवा अधिक रकमेची व्यवस्था केली तर चांगले होते.

 या कर्जावरील व्याजदर

  • गृहकर्जावरील व्याजदर कमीआ हे.
  • जमीन कर्ज जास्त व्याजदराने  उपलब्ध आहे.

कर्जाची परतफेड कालावधी

  • गुळकर्जाच्या बाबतीत कर्जाची परतफेड करण्याची मुदत 30 वर्षांपर्यंतअसूशकते.
  • जमीन कर्जामध्ये कर्जाची परतफेड करण्याची मुदत जास्तीत जास्त पंधरा वर्षे असू शकते.

( संदर्भ- द फोकस इंडिया )

English Summary: an important information for those person take loan for land
Published on: 13 December 2021, 07:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)