Others News

Ajit Pawar : अजित पवार यांचा सातत्याने भावी मुख्यमंत्री असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून उल्लेख केला जात आहे. आता त्यातच पुढील दीड वर्षात अजित पवार मुख्यमंत्री असं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ बोलताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करुन प्रतिसाद दिला.

Updated on 05 June, 2023 11:09 AM IST

Ajit Pawar : अजित पवार यांचा सातत्याने भावी मुख्यमंत्री असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून उल्लेख केला जात आहे. आता त्यातच पुढील दीड वर्षात अजित पवार मुख्यमंत्री असं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ बोलताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करुन प्रतिसाद दिला.

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील हतगडमध्ये महाविकास आघडीच्या काळात दिलेल्या निधी प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन केलं होतं. त्यात नरहरी झिरवाळ आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे, असं भाष्य केलं.

नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या भाष्याला अजित पवार यांनी उत्तर दिलं. भाषणासाठी उभे राहिल्यानंतर अजित पवार म्हणाले की, "अमुक एक मुख्यमंत्री झाला पाहिजे असं वक्ते बोलले, पण भाषण करुन मुख्यमंत्री होत नाही त्यासाठी 145 आमदारांचे संख्याबळ पाहिजे." तसंच महाविकास आघाडीच्या ज्या पक्षाची जिथे ताकद आहे ती जागा लढवणार असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 2000 रुपये हवे असतील तर लगेच करा हे काम

एकंदरीत अजित पवार यांचा स्वभाव पाहता अद्याप मुख्यमंत्रिपदासाठी आपल्या नावाची चर्चा करु नका असे ते अधिकारवाणीने बोलू शकले असते पण त्यांनी तसे न करता एकप्रकारे मूक संमती दिली.

राज्यातील राजकीय पक्षांना सध्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षाच्या बैठकांचे सत्र आणि मोर्चेबांधणी सुरु आहे, त्यातच महाविकास आघाडीमध्ये भावी मुख्यमंत्रिपदासाठी जणू स्पर्धाच सुरु आहे.

English Summary: Ajit Pawar will become Chief Minister in the next one and a half years
Published on: 05 June 2023, 11:09 IST