Others News

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) कृषी विद्यालय (कांचनवाडी) यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमातंर्गत कृषिदूत सौरभ जपे यांनी कव्हळा ता.चिखली येथील आदर्श व प्रगतशील शेतकरी देवानंदजी जाधव यांची मुलाखत घेतली.

Updated on 31 August, 2021 11:24 PM IST

विदर्भ आणि शेती यांचं नात जरा वेगळेच, सततचा दुष्काळ आणि पाऊस पडला तर अवकाळी किंवा अवेळी असे न भसणारे गणित असते.त्यामुळे येथल्या शेतकरी सतत अडचणीत असतो व तोट्यातली शेती करतो असे म्हटले जाते.  मात्र हे सर्व खोटे ठरवलंय चिखली तालुक्यातील कव्हळा गाव च्या देवानंदजी जाधव यांनी मागील वर्षी जून महिन्यात त्यांनी भोपळे,कारले आणि दोडके यांची अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड केली.

चार महिने पावसाचे असल्याने त्यांना पाण्यासाठी मेहनत घ्यावी लागली नाही.पाऊसच्या पाण्यावरच त्यांनी ही शेती केली. केवळ चार महिन्यातच त्यांनी तब्बल ४ लाखांचे उत्पादन घेत प्रगती साधली. दोन एकर मध्ये त्यांनी हे भाजी लागवड केली होती.त्यांची ही जमीन तशी बघितली तर कमी सुपिकच होती मात्र या कमी सुपीक जमिनीचा वापर करत त्यांनी यशाचे शिखर गाठले.शेती मध्ये उत्पादन घेतल्या नंतर त्यांचा समोर बाजारपेठेचा मोठा प्रश्न होता.

.मात्र त्यावर ही मात करत त्यांनी जवळ असलेल्या अकोला ,अमरावती बाजार पेठेचा पर्याय निवडला,तसेच परराज्यात या पिकांना जास्त भाव असल्याने त्यांनी हैदराबाद पर्यंत आपला भाजीपालाची निर्यात केली.

        प्रत्येक दुसऱ्या दिवशी त्यांनी भाजीची तोड केली. त्यांना मिळालेले हे यश भगता सद्या आजू बाजूच्या गावचे लोक देखील भाजीपाला शेती कडे वळलेत.

        शेती करतांना देवानंद जाधव यांनी पारंपरीक शेतीला छेद देत त्यामध्ये नवनवीन प्रयोग केले.दुधी भोपळा कारली आणी दोडकी ही पिके वेलवर्गय असल्या मुळे बांबूचा जास्तीत जास्त वापर करावा लागतो मात्र या शेकर्यांनी कमीतकमी बांबू वापर करून तारे आणि वायर चा वापर केला.आता या साहित्याचा त्यांना पुनर्वापर ही करता येणार आहे.

        त्याच प्रमाणे पारंपरीक सोयाबीन शेती ला दूर न लोटत त्यांनी त्यामध्ये सुद्धा नवनवीन प्रयोग केले.सोयाबीन चा नवीन प्रतिकारक्षम वाणांची लागवड करून त्यात पिकाची जोमदार वाढ व्हावी यासाठी जीवामृत तयार करून त्याचा वापर केला. सोयाबीन वर किडींचा प्रादुर्भाव होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पानांवर दर्शपर्णी अर्काचा फवारणीच्या वापर केला.देवानंद जाधव यांना ११ एकर मधून तब्बल १०० क्विंटल सोयाबीन चे उत्पादन घेतले या वर्षी चा ७८०० रूपाच्या भावामध्ये त्यांनी ते विकले असता, बियाणे,मजुरी चा ८० हजारांचा खर्च वजा जाता त्यांना ७ लाखांचा निव्वळ नफा त्यांना मिळाला आहे.

दुष्काळाचा शेतीवर काही परिणाम होऊ नये म्हणून व पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब साठवता यावा यासाठी दोन वर्षे पाणी पुरवठा होईल एवढा २.५ कोटी लिटर चे शेततळे त्यांनी बांधले विदर्भातही आजकाल शेतीचे नवनवीन प्रयोग होऊ लागल्याचे हे चांगले उदाहरण आहे. विदर्भातील शेतकरी हा तोट्यात शेती करतो अशी सर्वसादरण ओरड असायची मात्र कव्हळातील देवानंद जाधव यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करून एक नवा आदर्शच निर्माण केलाय.

 

English Summary: agriculture students interview with farmer
Published on: 31 August 2021, 11:24 IST