सैन्य दलात भरती होणे हे बऱ्याच तरुणांचे एक साहसी स्वप्न आहे. विशेषतः ग्रामीण भागातील तरुण हे सैन्य भरती मध्ये जाण्यासाठी खूपच उत्सुक असतात आणि त्या दृष्टीने प्रचंड कष्ट उपसतात.
खूपच मेहनत घेत असतात. अशासैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे.सैन्यात भरती करण्यासाठी एक नवीन मार्ग लवकरच येणार असून या योजनेस अग्निपथ भरती प्रवेश योजना अशाआशयाचे नाव देण्यात आले आहे. या योजनेबाबत या लेखात माहिती घेऊ.
अग्निपथ भरती योजना
या योजनेमध्ये तरुणांना सुरुवातीला तीन वर्ष सैन्यामध्ये शिपाई या पदावर भरती करण्यात येईल. यामध्ये भारतीय लष्करात जाण्यासाठी जी वयाची मर्यादा आहे त्यातही मोठा बदल करण्यात येईल. या मध्ये जे तरुण तीन वर्षे सैन्यदलात सेवा देतील अशा जवानांना अग्निविर असे संबोधले जाईल.
नंतर हा तीन वर्षाचा कालावधी जेव्हा संपेल तेव्हा यामधील काही अग्नि वीरांना पुढे लष्करी सेवेत कायम ठेवण्याचा पर्याय संरक्षण दलाकडे असणार आहे. या योजनेचा एक आराखडा तयार करण्यात आला असून तो आता अंतिम टप्प्यात आला आहे. या योजनेचा आराखडा चेआर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स कडून प्रेझेंटेशन करण्यात येत आहे. इतकेच नाही तर शासनाच्या उच्च स्तरावर देखील प्रेझेंटेशन केले जात आहे. संबंधित विषयावर दोन वर्षांपूर्वी टूर ऑफ ड्युटी यावर चर्चा झाली होती तेव्हापासून हा मुद्दा सुरु झाला. तसेच एक अल्पमुदत करार केला जाईल व त्यानुसार भरती केलेजाईल.यानुसार भरती करण्यात आलेल्या तरुणांना प्रशिक्षण देऊन वेगवेगळ्या भागात तैनात करण्यात येईल. त्यासाठी तीनही संरक्षण दलांना विशिष्ट कामासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करू शकतील.
नक्की वाचा:विचार कराल! 80 एकर शेताला पाण्याचा पुरवठा परंतु वीज आणि इंधन न वापरता, जाणून घेऊ पद्धत
महत्वाचे
जर आपण तिन्ही दलांचा विचार केला तर सव्वा लाखांपेक्षा अधिक पदेही रिक्त आहेत. लष्कराच्या बैठका घेऊन याबाबत आराखडा निश्चित होईल व सुरुवातीला योजनेनुसार, निवड झालेल्या अग्निविर यांना संरक्षण सेवेची तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर खाजगी क्षेत्रात नागरी नोकऱ्या दिल्या जातील. अनेक कंपन्यांनी या अग्निशमन दलाला सेवेत ठेवण्यात स्वारस्य दाखवले. त्यामुळे सदरील नागरी कंपन्यांना लष्करामध्ये प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध सैनिकांचा फायदा होईल.
( स्त्रोत-The focus india)
Published on: 07 April 2022, 11:15 IST