Others News

भारतात सर्वात मोठा दस्ताऐवज म्हणजेच आधार कार्ड, आपल्या ओळखीचा सर्वात मोठा प्रूफ आहे आधार. आणि सरकार ह्या आधार कार्डशी अनेक इतर डॉक्युमेण्ट संलग्न करण्यासाठी वारंवार सूचना देत आहे आणि आता इतर डॉक्युमेण्टशी आधार लिंक करणे अनिवार्य झाले आहे. ह्या यादीत आता आपल्या ड्रायविंग लायसन्सचा पण समावेश झाला आहे आता ड्रायविंग लायसन्सला आधार लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही कागदपत्रे आधारशी जोडल्यानंतरच त्यांच्याशी संबंधित काम सहजपाने करता येणार आहे.

Updated on 05 October, 2021 10:58 AM IST

भारतात सर्वात मोठा दस्ताऐवज म्हणजेच आधार कार्ड, आपल्या ओळखीचा सर्वात मोठा प्रूफ आहे आधार. आणि सरकार ह्या आधार कार्डशी अनेक इतर डॉक्युमेण्ट संलग्न करण्यासाठी वारंवार सूचना देत आहे आणि आता इतर डॉक्युमेण्टशी आधार लिंक करणे अनिवार्य झाले आहे. ह्या यादीत आता आपल्या ड्रायविंग लायसन्सचा पण समावेश झाला आहे आता ड्रायविंग लायसन्सला आधार लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही कागदपत्रे आधारशी जोडल्यानंतरच त्यांच्याशी संबंधित काम सहजपाने करता येणार आहे.

 त्यामुळे इतर डॉकमेण्टशी आधारची लिंकिंग करणे फार गरजेचे झाले आहे. असे असले तरी, काही लोकांना ड्रायव्हिंग लायसन्सला आधारशी जोडण्याच्या प्रक्रियेची माहिती नाही, ज्यामुळे त्यांच्यासाठी अनेक समस्या निर्माण होत आहेत आणि ते आपले लायसन्स आधारशी लिंक करत नाही आहेत.

अशा परिस्थितीत, जर तुम्हीही अजून तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सला आधारशी लिंक केले नसेल आणि प्रक्रिया समजून घेण्यात अडचण येत असेल, तर आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्सद्वारे संपूर्ण आधार आणि लायसन्स लिंकिंग प्रक्रिया सांगत आहोत. यानंतर आपण या दिलेल्या माहितीचे अनुसरण करून घरी बसून ही दोन कागदपत्रे जोडू शकता. चला तर मग जाणुन घेऊया आधार आणि लायसन्स लिंक करण्याची पद्धत.

 

लायसन्स आधार कार्डशी लिंक करण्याची प्रोसेस

»लायसन्स आधार कार्डाशी लिंक करण्यासाठी म्हणजेच जोडण्यासाठी सर्वप्रथम राज्य परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जा.

»वेबसाईटवर गेल्यानंतर आधार लिंक ह्या ऑप्शन वर क्लिक करा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून ड्रायव्हिंग लायसन्स निवडा.

»हे केल्यानंतर, तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाका आणि Get Details वर क्लिक करा.

»गेट डिटेल्स वर क्लिक केल्यावर येथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाका.

»त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटनवर क्लिक करा. सबमिट केल्याशिवाय तुमचा आधार लायसन्सशी लिंक होणार नाही ह्याची खबरदारी बाळगा.

»एवढं केल्यानंतर तुमच्या आधारशी नोंदणी केलेला मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. आणि मिळालेला ओटीपी दिलेल्या रकाण्यात टाका.

»आणि शेवटी तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करा.

 

हेही वाचा - आधार कार्डवरचा फोटो आवडत नाही का? मग आता सेकंदात बदला आपला आधारवरचा फोटो

 लायसन्सशी आधार लिंक करून काय होणार आहे फायदा

ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी लिंक केल्यानंतर ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त लायसन्स आहेत म्हणजे जे फर्जी लायसन्स वापरतात त्यांच्यावर बंदी घालण्यात येईल आणि कोणीही बनावट लायसन्स ठेवू शकणार नाही आणि जरी त्यांनी तशे लायसन्स आपल्या जवळ बाळगले तरी ते ओळखले जाईल त्यामुळे साहजिकच फर्जी लायसन्सचा गैरवापर थांबवता येईल. याशिवाय भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल आणि शासनाच्या कामात अधिकच पारदर्शकता येईल.

English Summary: adhaar card link to driving licence is necessary
Published on: 05 October 2021, 10:58 IST