Others News

भारतात टू व्हीलर सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात गाड्या उपलब्ध आहेत, यात कमी बजेटमध्ये देखील अनेक स्कुटी आहेत. स्कूटर ची किंमत भारतात साठ हजारापासून सुरू होते तर एक लाखापर्यंत जाते. भारतात सध्या पेट्रोलचे दर शंभरी पार झाले आहेत त्यामुळे अनेक लोक चांगल्या मायलेज वाली बाइक घेणे पसंत करतात. जर आपणासही चांगल्या मायलेज वाली स्कूटर खरेदी करायची असेल पण स्कूटर खरेदी करण्यासाठी आपल्याकडे एवढी मोठी रक्कम नसेल तर आम्ही खास आपणासाठी एक ऑफरविषयी माहिती घेऊन आलो आहोत. आज आम्ही आमच्या वाचक मित्रांसाठी होंडा एक्टिवा स्कूटर वर मिळणाऱ्या ऑफर विषयी माहिती सांगणार आहोत.

Updated on 29 December, 2021 5:46 PM IST

होंडा एक्टिवा भारतात सर्वात जास्त विकले जाणारे स्कूटर आहे. भारतात या गाडीची शोरूम किंमत 70 हजार रुपयापासून ते 73 हजार रुपयापर्यंत आहे. परंतु ही होंडा एक्टिवा आपणास फक्त 21 हजार रुपयात उपलब्ध होऊ शकते. होंडा एक्टिवा ही स्कूटर Bikes 24 या वेबसाईटवर केवळ 21 हजार रुपयात मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की Bikes 24 एक सेकंड हॅन्ड गाडी खरेदी व विक्री करणारी साईट आहे. जर आपल्याकडे नवी स्कूटर घेण्यासाठी पुरेशी रक्कम नसेल तर आपण या साइटवरून सेकंड हॅन्ड होंडा ॲक्टिवा ही स्कूटर केवळ 21 हजार रुपयात आपल्या नावावर करू शकता.

बाईक ट्वेंटी फोर या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, हिरो होंडा ॲक्टिवा स्कूटर 2014 या वर्षाची गाडी आहे. आणि ही गाडी आत्तापर्यंत केवळ 29103 किलोमीटर धावली आहे. या होंडा एक्टिवा गाडीची ओनरशिप दुसरी आहे. तसेच ही गाडी हरियाणा राज्यातील आहे आणि ही गाडी HR 51 या आरटीओ ऑफिसमध्ये रजिस्टर्ड आहे. जर आपणास ही गाडी खरेदी करायची असेल तर बाईक्स 24 कंपनी आपणास एक वर्षाची गॅरंटी सुद्धा देत आहेत. मित्रांनो मी आपणास सांगू इच्छितो की वॉरंटी साठी कंपनीने काही नियम व अटी घालून दिलेल्या आहेत. त्या अटी व शर्तींच्या अधीन राहून आपणास कंपनीकडून एक वर्षांची वॉरंटी प्राप्त होऊ शकते.

याशिवाय कंपनी सात दिवसाची मनी बँक गॅरंटी सुद्धा देत आहे, म्हणजे जर आपण गाडी खरेदी केली पण आपणांस ही गाडी आवडली नाही तर आपण सात दिवसाच्या आत ही स्कुटर कंपनीला परत पाठवू शकता. परंतु यासाठी देखील कंपनीने काही अटी व शर्ती  लावून दिलेल्या आहेत. हिरो होंडा एक्टिवा गाडी 60 किलोमीटर पर लिटर मायलेज देण्यास सक्षम आहे. जर आपणास गाडी खरेदी करायची असेल तर आपण बाईक 24 या वेबसाइटला भेट देऊ शकता.

English Summary: activa scooter get in only twenty one thousand on bikes 24 website
Published on: 29 December 2021, 05:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)