Others News

आपल्याकडे असलेल्या अधिकृत दस्तऐवजांपैकी एक महत्वाचे दस्ताऐवज म्हणजे (Aadhar Card) आधार कार्ड. आधार कार्ड खरं पाहता भारतीय नागरिकांचा एक ओळखीचा पुरावा (Identity Card) आणि रहिवाशी पुरावा म्हणून वापरला जातो. याशिवाय भारतात मायबाप सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आधार (Aadhar Card) कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.

Updated on 27 May, 2022 10:10 PM IST

आपल्याकडे असलेल्या अधिकृत दस्तऐवजांपैकी एक महत्वाचे दस्ताऐवज म्हणजे (Aadhar Card) आधार कार्ड. आधार कार्ड खरं पाहता भारतीय नागरिकांचा एक ओळखीचा पुरावा (Identity Card) आणि रहिवाशी पुरावा म्हणून वापरला जातो. याशिवाय भारतात मायबाप सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आधार (Aadhar Card) कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.

याशिवाय, रेशन कार्ड, पासपोर्ट आणि पॅन कार्ड (Pan Card) यांसारखी इतर महत्वाची सरकारी कागदपत्रे मिळविण्यासाठी देखील आधार कार्ड सरकारने अनिवार्य केले आहे. अशा परिस्थितीत, ओळखीचा पुरावा म्हणून आधार क्रमांकाची पडताळणी करणे आता महत्त्वाचे ठरते. अनेक वेळा असे घडते की तुमच्याकडे असलेले आधार कार्ड बनावट असते.

होय, बरोबर ऐकलंत तुम्ही. अशी अनेक प्रकरणे आता समोर येऊ लागली आहेत ज्यामध्ये व्यक्तीचे आधार कार्ड बनावट आढळत आहे. यामुळे तुम्ही वापरत असलेले आधार कार्ड खरे आहे की बनावट हे ओळखण्यासाठी आज आपण नेमकी कोणती प्रोसेस आहे याविषयी जाणुन घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

आधार क्रमांक खर आहे की बनावट हे कसे ओळखणार 

»तुमचा आधार क्रमांक सत्यापित करण्यासाठी, तुम्हाला खालील स्टेप्स फॉल्लो करणे आवश्यक आहे.

»सर्व प्रथम तुम्हाला UIDAI वेबसाइटवर जावे लागेल आणि नंतर आधार सेवा अंतर्गत दिलेल्या आधार क्रमांकाची पडताळणी करा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आधार धारकाचा आधार क्रमांक टाका.

»यानंतर कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागणार आहे आणि 'आधार सत्यापित करा' या बटणावर क्लिक करावे लागणार आहे.

»एकदा तुम्ही हे केल्यावर तुमचा आधार क्रमांक पडताळला आहे की नाही ते तपासा. याशिवाय, तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरचे शेवटचे 3 अंक, वय, लिंग, राज्य असे तपशील एंटर करावे लागतील. यामुळे तुमचा आधार क्रमांक सत्यापित झाला आहे की नाही हे कळेल.

हा देखील मार्ग आहे-

»आधार QR स्कॅनर अॅप तुमच्या Android स्मार्टफोनवर Google Play द्वारे किंवा Apple च्या App Store वरून iPhone द्वारे डाउनलोड करा आणि अॅपमध्ये लॉग इन करा.

»कार्डधारकाच्या आधार कार्डावरील QR कोड स्कॅन करा. असे केल्याने आधार क्रमांकाची पडताळणी झाली आहे की नाही हे कळेल. 

English Summary: Aadhar Card: Your Aadhar Card is fake, isn't it? Learn the process of identifying fake Aadhaar card
Published on: 27 May 2022, 10:10 IST