आजकाल आधार कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. म्हातारा असो, तरुण असो वा लहान, प्रत्येकाकडे आधार असणे आवश्यक आहे. आज कोणतेही सरकारी काम असो की खाजगी, प्रत्येक कामात आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, फोटो, जन्मतारीख इत्यादी सर्व माहिती असते.
इतर अनेक कागदपत्रांपेक्षा हे सर्वात वेगळे आणि महत्वाचे आहे कारण की त्यात प्रत्येक नागरिकाची बायोमेट्रिक माहिती नोंदवली जाते. अशा परिस्थितीत आधार कार्डच्या वाढत्या उपयुक्ततेमुळे ते अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
अनेकवेळा असे घडते की कामानिमित्त किंवा अन्य काही कारणामुळे आपण घर बदलतो त्यामुळे आपला पत्ता बदलला जातो. आता जर आधार आधीच जनरेट झाला असेल तर आपल्याला आधार कार्डमधील पत्ता देखील बदलावा लागेल.
अशा परिस्थितीत, UIDAI ने पत्ता बदलण्यासाठी काही नियम जारी केले आहेत. आता आधार कार्ड मध्ये तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा पत्ता तुम्ही बदलू शकता. मात्र आधार कार्डमध्ये पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला ऍड्रेस प्रूफसाठी काही कागदपत्रे जमा करावी लागतील. तुम्ही तुमचा पत्ता कसा बदलू शकता आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते आज आपण जाणुन घेणार आहोत.
महत्वाच्या बातम्या
Aadhar Card : तुम्ही बघितलं का निळ्या कलरचे नवीन आधार कार्ड? जाणून घ्या कोणाला मिळतं हे आधार कार्ड
मोठी बातमी! पीएम किसान योजनेचे 2 हजार 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही
या कागदपत्रांची आवश्यकता असेल: बँक पासबुक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल (तीन महिन्यांचे बिल), पाणी बिल (तीन महिन्यांचे बिल), आधारमध्ये पत्ता बदलण्यासाठी टेलिफोन बिल (तीन महिन्यांचे बिल), सरकारी ओळखपत्र, मालमत्ता कर पावती, मनरेगा कार्ड, शेतकरी पासबुक, पेन्शन कार्ड, शस्त्र परवाना, स्वातंत्र्य सैनिक कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला इ.
आधार कार्डमध्ये पत्ता कसा अपडेट करायचा:
»आधार कार्डमधील पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागेल.
»येथे MY Aadhaar पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
»यानंतर तुम्ही Update Your Aadhaar या पर्यायावर क्लिक करा.
»येथे तुम्हाला Update Demographics या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
»यानंतर UIDAI चे सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल उघडेल.
»यानंतर Proceed to Update Aadhaar हा पर्याय निवडा.
»येथे तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करा.
»यानंतर तुम्ही येथे टाकलेल्या मोबाइलवर OTP येईल.
»यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल ज्यामध्ये नवीन पत्ता भरा.
»यानंतर, तुमच्या आधारमध्ये पत्ता अपडेट करण्यासाठी, तुम्हाला ऍड्रेस प्रूफ स्कॅन करून अपलोड करावा लागेल.
त्यानंतर सबमिट बटण दाबा. आधार कार्डमधील पत्ता अपडेट पूर्ण होईल.
»यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू ऑप्शनमध्ये आधारमधील अपडेटेड ऍड्रेस पाहता येईल. बघितलं किती सोप आहे आधार कार्ड मध्ये पत्ता अपडेट करणं.
Published on: 02 May 2022, 05:48 IST