Others News

Aadhar Card Update : भारतात आधार कार्ड (Aadhar Card) एक ओळखीचा पुरावा म्हणून ओळखला जातो. मित्रांनो आधार कार्ड (Aadhar News) हे तुमच्या सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी (Government Document) एक आहे. जे नेहमी तुमच्या खिशात असते. पण वेळोवेळी, तुम्हाला आधार कार्डमध्ये अनेक चेंजेस देखील करायचे असतात, जसे की पत्ता बदलणे, किंवा जन्मतारखेशी संबंधित इतर कोणतीही माहिती चुकीची असल्यास, तुम्ही ती बदलू शकता.

Updated on 11 September, 2022 9:55 AM IST

Aadhar Card Update : भारतात आधार कार्ड (Aadhar Card) एक ओळखीचा पुरावा म्हणून ओळखला जातो. मित्रांनो आधार कार्ड (Aadhar News) हे तुमच्या सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी (Government Document) एक आहे. जे नेहमी तुमच्या खिशात असते.

पण वेळोवेळी, तुम्हाला आधार कार्डमध्ये अनेक चेंजेस देखील करायचे असतात, जसे की पत्ता बदलणे, किंवा जन्मतारखेशी संबंधित इतर कोणतीही माहिती चुकीची असल्यास, तुम्ही ती बदलू शकता.

पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही आधार कार्डमध्ये तुमचा फोटो (Aadhar Card Photo Change) देखील बदलू शकता? जरी त्याची पद्धत ऑनलाइन (Aadhar Card Online) नसली, तरी आज आम्ही तुम्हाला आधार कार्डमध्ये फोटो बदलण्याची प्रक्रिया सांगणार आहोत.

आधार कार्ड मध्ये फोटो कसा बदलायचा

जर तुम्हाला आधार कार्डमधील फोटो बदलायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रात जावे लागेल. कारण आधार वरील फोटो ऑनलाइन अपडेट करता येत नाही. आधार कार्डमधील फोटो बदलण्यासाठी 100 रुपये शुल्क भरावे लागते.

सर्वप्रथम, आधार सेवा केंद्रावर तुमचा फोटो बदलण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर UIDAI त्यावर प्रक्रिया करेल. तुमचे आधार कार्ड सोबत घेऊन आधार केंद्रावर जा.

तुमचा फॉर्म भरल्यानंतर, UIDAI अधिकारी तुमचे आधार कार्ड तपशील तपासतील. सर्व काही योग्य आढळल्यानंतर, ते एक नवीन फोटो कॅप्चर करतील. त्याच वेळी, फोटो अपडेट करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या ओळखपत्रासाठी काही कागदपत्र द्यावे लागतील. मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, रेशन कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक तुम्ही देऊ शकता.

तुम्हाला अपडेट विनंतीसाठी पोचपावती दिली जाईल. त्यानंतर तुम्ही UIDAI च्या वेबसाइटवरून आधार कार्ड अपडेटची स्थिती तपासू शकता. तथापि, आधार अधिकारी त्यांच्या कॅमेर्‍याच्या ठिकाणी फोटो कॅप्चर करत असल्याने तुम्हाला फोटो देण्याची गरज नाही.

अशा प्रकारे तुमचा आधार कार्डमधील फोटो बदलला जाईल. फोटो बदलल्यानंतर, तुमचा नवीन फोटो असलेले आधार कार्ड दोन आठवड्यांत तुमच्या पत्त्यावर पोहोचेल. त्याच वेळी, फोटो बदलल्यानंतर, तुम्ही पावती मिळाल्यापासून आधार अपडेटची प्रगती स्थिती तपासू शकता.

English Summary: aadhar card update aadhar card photo change
Published on: 11 September 2022, 09:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)