Others News

मित्रांनो भारतात आधार कार्ड (Aadhar Card) आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक कागदपत्र बनले आहे. होय, आजच्या काळात आधार कार्डाशिवाय व्यक्तीला स्वतःची ओळख नाही असं जरी म्हटलं तरीही काही वावगं ठरणार नाही. मित्रांनो भारतात सरकारी कामापासून ते महत्वाच्या गैर सरकारी कामात आधार कार्डचा वापर केला जातो.

Updated on 09 May, 2022 5:16 PM IST

मित्रांनो भारतात आधार कार्ड (Aadhar Card) आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक कागदपत्र बनले आहे. होय, आजच्या काळात आधार कार्डाशिवाय व्यक्तीला स्वतःची ओळख नाही असं जरी म्हटलं तरीही काही वावगं ठरणार नाही. मित्रांनो भारतात सरकारी कामापासून ते महत्वाच्या गैर सरकारी कामात आधार कार्डचा वापर केला जातो.

भारतात आधार कार्ड विना साधं एक सीमकार्ड देखील खरेदी केले जाऊ शकत नाही. एवढंच नाही तर आधार कार्ड सर्व सरकारी कामात बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड असणे खूप महत्वाचे आहे.

महत्वाच्या बातम्या:

LPG सिलिंडर ग्राहकांसाठी मोठी बातमी; आता अपघात झाल्यास मिळणार बंपर फायदा…

कामाची बातमी! तुम्ही वापरत असलेले पॅन कार्ड ओरिजिनल की डुप्लिकेट? आता तुमचा मोबाईलचा कॅमेराच सांगेल; वाचा याविषयी

मात्र काही वेळा पाण्यामुळे किंवा अन्य काही कारणामुळे आधार कार्ड खराब होते. यामुळे आधार कार्ड धारक व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र जर तुमचे आधार कार्ड खराब झाले असेल किंवा हरवले असेल तर काळजी करू नका.

आज आपण आधार कार्ड हरवले असल्यास कशा पद्धतीने ते प्राप्त करू शकता याविषयी जाणून घेणार आहोत. याशिवाय पाणी किंवा इतर द्रव्य पदार्थांमुळे आपले आधार कार्ड खराब होऊ नये यासाठी भारत सरकारने जारी केलेले पीव्हीसी आधार कार्ड कसे मिळवायचे याविषयी देखील आज आपण जाणून घेणार आहोत.

ऑनलाइन PVC आधार कार्ड बनवण्याची प्रक्रिया

»आधार कार्ड ऑनलाइन बनवण्यासाठी, तुम्हाला PVC आधार बनवावे लागेल.

»यासाठी तुम्हाला प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जावे लागेल.

»यानंतर लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला पीव्हीसी आधार कार्डचा पर्याय दिसेल.

»तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

»यानंतर तुम्हाला त्यात तुमचा आधार क्रमांक टाकण्यास सांगितले जाईल. ज्यामध्ये तुम्हाला योग्य 12 अंकी आधार क्रमांक भरावा लागेल.

»यानंतर, कॅप्चा तुमच्या समोर येईल, जो बरोबर भरावा लागेल.

»हे सर्व केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार लिंक मोबाईल नंबर टाकावा लागेल.

»तुमच्या लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल तो दिलेल्या रकाण्यात भरावा लागेल.

»यानंतर पुढील पायरी पेमेंट मोडची येते. ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करावे लागेल.

»यामध्ये तुम्हाला फक्त 50 रुपये द्यावे लागतील.

»ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट स्लिप मिळेल.

»या सर्व प्रक्रियेनंतर पीव्हीसी आधार कार्ड तुमच्या दिलेल्या पत्त्यावर 3 ते 5 दिवसात पोहोचेल.

English Summary: Aadhar Card: Make PVC Aadhar Card for only Rs. 50; Read how to make it
Published on: 09 May 2022, 05:16 IST