नवीन मुंबई: भारतात भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड (Aadhar Card) एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून ओळखला जातो. आधार कार्ड शिवाय भारतात साध एक सिम कार्ड देखील काढणं अलीकडे अशक्य झालं आहे. आधार कार्ड भारतीय नागरिकांचा एक ओळखीचा, रहिवाशीचा महत्त्वाचा पुरावा आहे. आधार कार्ड प्रत्येक सरकारी कामात नव्हे नव्हे तर खाजगी कामात ग्राह्य धरल जाणार सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट मानल जात.
शासनाच्या वेगवेगळ्या योजनेत आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. कोणत्याच शासनाच्या योजनेचा लाभ आता आधार कार्ड विना मिळवणे अशक्य आहे. गॅसची सबसिडी मिळवण्यासाठी, बँकेत खाते खोलण्यासाठी, शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी, शाळेत दाखला घेण्यासाठी, पैसे ट्रान्सफर करण्यासाठी, पैसे काढण्यासाठी, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी, कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वत्र आधार कार्ड आता बंधनकारक आहे.
यामुळे जर समजा तुमचे आधार कार्ड हरवले तर तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अनेक शासकीय योजनेपासून वंचित रहावे लागू शकते. यामुळे आज आम्ही खास तुमच्यासाठी आधार कार्ड हरवल्यावर कशा पद्धतीने आधार कार्ड परत मिळवले जाऊ शकते याविषयी सविस्तर माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहितीविषयी.
आधार क्रमांक कसा मिळवणार बरं
»मित्रांनो जर तुमचेही आधार कार्ड हरवले असेल तर तुम्ही डुप्लिकेट आधार कार्ड मागवू शकता. यासाठी तुम्हाला आधार जारी करणारी संस्था अर्थात UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.
»या नंतर आधार क्रमांक (UID) किंवा नावनोंदणी क्रमांक (EID) यापैकी एक पर्याय निवडावा लागेल.
»नोंदणीकृत नाव, ईमेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक यासारखी माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे.
»यानंतर तुमच्या स्क्रीनवर सिक्युरिटी कोड दिसेल, तो टाइप करा.
»'ओटीपी पाठवा' वर क्लिक करा किंवा 'एंटर ओटीपी' वर टॅप करा.
»यानंतर तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर किंवा तुम्ही आधारला दिलेल्या ईमेल आयडीवर ओटीपी पाठवला जाईल. तो टाकून एंटर की प्रेस करा.
»तुमचा आधार क्रमांक तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवला जाईल.
डुप्लिकेट आधार कार्ड ऑनलाइन कसे मिळवायचे :
आधार जारी करणारी संस्था UIDAI च्या ऑफीसियल वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे आणि हरवलेला किंवा विसरलेला EID/UID पुनर्प्राप्त करा या ऑप्शनवर क्लिक करावे लागणार आहे.
»मित्रांनो यानंतर आपणास ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करावे लागणार आहे.
»एवढे केल्यानंतर सुरक्षा कोडसह तुमचा 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी ईआयडी प्रविष्ट करावा लागणार आहे.
»जर तुमचा मोबाइल नंबर तुमच्या आधार कार्डमध्ये नोंदणीकृत नसेल, तर चेक बॉक्समध्ये खूण करा आणि नॉन-नोंदणीकृत मोबाइल नंबर प्रविष्ट करा.
»जर तुमच्याकडे नोंदणीकृत मोबाईल नंबर असेल तर Send OTP किंवा Enter TOTP बटणावर क्लिक करा.
»OTP एंटर करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
»तुम्ही आधार कार्ड तपशीलांचे पूर्वावलोकन करू शकता.
»यासाठी तुम्हाला काही नाममात्र शुल्क देखील अदा करावा लागणार आहे. UPI, नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट करा.
»एकदा पेमेंट झाले की, तुम्ही पेमेंट स्लिप डाउनलोड करू शकता.
»UIDAI च्या अधिकृत वेबसाइटनुसार, तुम्ही आधार PVC कार्डसाठी विनंती केल्यानंतर तुमचे आधार कार्ड तुम्हाला 5 दिवसाच्या आत पोस्टाने पाठवले जाईल.
Published on: 27 May 2022, 02:05 IST