ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर फसवणुकीची प्रकरणे टाळण्यासाठी, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्ड धारकांना त्यांचा मोबाइल क्रमांक 12 अंकी आधार क्रमांकासह अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. UIDAI कडून मिळालेल्या माहितीनुसार, हे काम सर्व आधार कार्ड धारकांसाठी खूप महत्वाचे आहे.
त्यामुळे जर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आधार कार्डशी लिंक नसेल. तर आधार कार्डला मोबाईल नंबर आणि इमेल लिंक करणे आवश्यक आहे. याशिवाय UIDAI ने आधार कार्ड धारकांना त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी लिंक केल्याची स्थिती तपासण्याचे आवाहन केले आहे आणि आधार कार्ड धारकांना त्यांचा मोबाईल नंबर कायम आधार कार्डला अपडेट ठेवण्यास सांगितले आहे.
त्यामुळे जर कोणत्याही आधार कार्डधारकाला त्याचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी लिंक आहे की नाही याबाबत खात्री नसेल, तर अशा व्यक्तीने थेट UIDAI लिंकवर लॉग इन करावे आणि आपल्या आधार कार्डशी मोबाईल नंबर अथवा इमेल लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.
हेही वाचा
Aadhar Card : तुम्ही बघितलं का निळ्या कलरचे नवीन आधार कार्ड? जाणून घ्या कोणाला मिळतं हे आधार कार्ड
आधार कार्ड लिंकिंगची माहिती कशी मिळवायची
सर्वप्रथम, आधार कार्डधारकांना UIDAI लिंक - uidai.gov.in/verify-email-mobile वर जाऊन लॉग इन करावे लागेल.
यानंतर, तुमचा 'मोबाइल नंबर' किंवा 'ईमेल आयडी' यापैकी कोणताही एक पर्याय निवडून त्याची पडताळणी करावी लागेल.
त्यानंतर तुम्ही निवडलेल्या पर्यायावर अवलंबून तुमचा आधार क्रमांक किंवा ईमेल आयडी प्रविष्ट करा.
तुमच्या निवडलेल्या पर्यायावर एक कॅप्चा दिसेल, जो प्रविष्ट करावा लागेल, त्यानंतर 'ओटीपी पाठवा' या पर्यायावर क्लिक करा.
तुमच्या दिलेल्या ईमेल आयडीच्या मोबाईल नंबरवर ओटीपी आला असेल, तर याचा अर्थ तुमचा मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेला आहे.
तुम्ही वर नमूद केलेल्या 4 सोप्या पायऱ्या फॉलो केल्यास, तुम्हाला भविष्यात कधीही फसवणुकीचा सामना करावा लागणार नाही.
Published on: 29 April 2022, 10:34 IST