Others News

भारतात आधार कार्ड एक महत्त्वाचे डॉक्युमेंट (Aadhar card is an important document) आहे. भारतात बँकिंग कामासाठी, शाळा-महाविद्यालयात ॲडमिशन घेण्यासाठी, अनेक सरकारी तसेच गैर सरकारी योजनेचा लाभ देण्यासाठी, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी, उज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी, नव्हे-नव्हे तर सिम कार्ड काढण्यासाठी देखील आधारचा वापर केला जातो. या एवढ्या महत्त्वाच्या डॉक्युमेंट ला आपल्या मोबाईल नंबर सोबत, आपल्या बँकेत, पॅन कार्ड सोबत, मतदान कार्ड सोबत, रेशन कार्ड सोबत लिंक करणे अनिवार्य आहे. बँकेत आधार कार्ड लिंक नसेल तर व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करणे अनिवार्य आहे (It is mandatory to link Aadhar card to the bank) आणि यामुळे आपलेच काम सोयीचे होणार आहे.

Updated on 14 January, 2022 11:59 AM IST

मित्रांनो भारतीय नागरिकाचे एकच आधार कार्ड सरकारद्वारा बनविले जाते, मात्र असे असले तरी अनेक व्यक्तींचे अनेक सिम कार्ड असतात तसेच अनेक बँक अकाउंट असतात. त्यामुळे अनेकदा आपला नंबर कोणत्या बँकेत लिंक आहे याविषयी संबंधित व्यक्तीला माहिती नसते. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या अशा संभ्रम स्थितीमध्ये असलेल्या व्यक्तींसाठी आजची बातमी खास आहे. मित्रांनो जर आपणास ही आपल्या आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे हे जाणून घ्यायचे असेल  तर यासाठी आपणास कोणत्याच आधार केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाहीये. आपण अगदी घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने या गोष्टींची माहिती जाणून घेऊ शकता. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया आपले आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे हे कसे चेक (Aadhar Card Bank Link Status) करायचे.

आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे या पद्धतीने करा चेक (Check the bank to which Aadhar card is linked)

मित्रांनो आपले आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपणास आधार जारी करणारी संस्था अर्थात युआयडीएआय (UIDAI) यांच्या ऑफिशिअल वेबसाईटला भेट द्यावी लागेल. साईटवर गेल्यानंतर तिथे होम पेजवर Check Your Aadhaar and Bank Account या पर्यायावर क्लिक करा. पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपणास आपला बारा अंकी आधार क्रमांक याठिकाणी प्रविष्ट करावा लागेल यासोबतच खाली दिलेला सेक्युरिटी कोड देखील भरावा लागणार आहे. 

यानंतर आपल्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी प्राप्त होईल, आपल्या मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी (One Time Password) आता दिलेल्या रकान्यात प्रविष्ट करा. त्यानंतर आपल्या समोर लोगिन चा पर्याय ओपन होईल त्याच्यावर क्लिक करा. मित्रांनो क्लिक केल्याबरोबरच आपले आधार कार्ड ज्या ज्या बँकेबरोबर लिंक असेल त्याची सर्व डिटेल आपल्यासमोर ओपन होईल. मित्रांनो जर आपणास आपल्या आधारकार्डचा गैरवापर थांबवायचा असेल तर आपण आधार कार्ड लॉक करू शकता.

English Summary: aadhar card is linked to which bank check it now with the help of this process
Published on: 14 January 2022, 11:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)