Others News

भारतात गेल्या काही वर्षांपासून आधार कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. म्हातारा असो, तरुण असो वा लहान, प्रत्येकाकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. आज कोणतेही सरकारी काम असो किंवा खाजगी, प्रत्येक कामासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. यामुळे आधार कार्डवर नाव, पत्ता, फोटो, जन्मतारीख इत्यादी सर्व माहिती अद्ययावत असणे आता अति आवश्यक आहे.

Updated on 23 May, 2022 12:22 AM IST

भारतात गेल्या काही वर्षांपासून आधार कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. म्हातारा असो, तरुण असो वा लहान, प्रत्येकाकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. आज कोणतेही सरकारी काम असो किंवा खाजगी, प्रत्येक कामासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. यामुळे आधार कार्डवर नाव, पत्ता, फोटो, जन्मतारीख इत्यादी सर्व माहिती अद्ययावत असणे आता अति आवश्यक आहे.

भारतात आधार कार्डविना साधं एक सिम कार्ड देखील खरेदी केले जाऊ शकत नाही. या वरून आधार कार्ड ची उपयोगिता आपल्याला समजलीच असेल. यामुळे इतर अनेक कागदपत्रांपेक्षा हे वेगळे आणि महत्वाचे कागदपत्र आहे. मित्रांनो आधार मध्ये प्रत्येक नागरिकाची बायोमेट्रिक माहिती नोंदवली जाते. अशा परिस्थितीत आधार कार्डच्या वाढत्या उपयुक्ततेमुळे ते अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

काय सांगता! 'ही' बँक देत आहे मुद्रा लोन; जाणुन घ्या याविषयीं

आधार कार्डमध्ये पत्ता कसा बदलायचा:

»आधार कार्डमधील पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे.

»अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी MY Aadhaar पर्यायावर क्लिक करावे.

»यानंतर Update Your Aadhar या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

»येथे तुम्हाला Update Demographics या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

»यानंतर UIDAI चे सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल उघडेल.

»यानंतर Proceed to Update Aadhaar हा पर्याय निवडा.

»येथे तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करा.

»यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल तो प्रविष्ट करावा लागणार आहे. 

»यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल ज्यामध्ये नवीन पत्ता भरा.

»यानंतर, तुमच्या आधारमध्ये पत्ता अपडेट करण्यासाठी, तुम्हाला अॅड्रेस प्रूफ स्कॅन करून अपलोड करावा लागेल.

»त्यानंतर सबमिट बटण दाबा. आधार कार्डमधील पत्ता अपडेट पूर्ण होईल.

»यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू ऑप्शनमध्ये आधारमधील अपडेटेड अॅड्रेस पाहता येईल.

Small Business Idea : फक्त 3 हजारात सुरु करा हा व्यवसाय आणि कमवा बक्कळ नफा; वाचा याविषयी

आधार कार्डला मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस 

»मित्रांनो जर तुमचे आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला आधार नोंदणी केंद्रावर अपॉइंटमेंट घ्यावी लागेल.

»तुम्ही नियुक्तीच्या दिवशी आधार सेवा केंद्राला भेट द्या.

»येथे तुम्हाला आधार सुधारणा फॉर्म दिला जाईल, जो तुम्ही भरू शकता.

»यानंतर नंबर बदलण्यासाठी 25 रुपये फी म्हणुन आकारले जातील.

»त्यानंतर तुम्हाला आधार विनंती क्रमांक दिला जाईल. आणि तिथे तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागेल.

»या संपूर्ण प्रक्रियेनंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल.

»या ओटीपीच्या मदतीने तुम्ही अपडेट क्रमांकासह आधार ऑनलाइन डाउनलोड करू शकता

»तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही UIDAI च्या टोल फ्री क्रमांक 1947 वर कॉल करू शकता.

Small Business Idea 2022: कमी खर्चात सुरु करा 'हा' व्यवसाय आणि कमवा महिन्याला 10 लाख; विश्वास नाही बसत मग एकदा वाचाच

आधार कार्डमध्ये फोटो कसा बदलायचा:

»सर्व प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून आधार नोंदणी फॉर्म डाउनलोड करा.

»ते भरल्यानंतर केंद्रावर उपस्थित अधिकारी बायोमेट्रिक पडताळणीद्वारे फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीची पडताळणी करतील.

»आता अधिकारी आधार नोंदणी केंद्र आणि आधार सेवा केंद्रावर फोटो क्लिक करतील. यानंतर फोटो बदलण्यासाठी तुम्हाला 25 रुपये आणि जीएसटी भरावा लागेल.

»यानंतर कर्मचारी तुम्हाला स्लिप देईल.

English Summary: Aadhar Card: Change the address, mobile number and photo on Aadhar Card in one minute; Learn the whole process
Published on: 23 May 2022, 12:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)