Aadhar Card : आधार कार्ड (Aadhar News) हे एक महत्त्वाचे दस्तऐवज (Document) आहे. आता ते तुमचे रेशनकार्ड, पॅनकार्ड (Pan Card) आणि इतर काही कागदपत्रे आणि खात्यांशी लिंक करणेही अनिवार्य झाले आहे.
आधार कार्डचा ट्रेंड वाढल्याने त्याचा गैरवापर होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. सायबर गुन्हेगार लोक आधारचा (Aadhar Update) गैरवापर करून आर्थिक फसवणूक तर करत आहेतच पण काही गुन्हेगारी कारवायांमध्येही त्याचा वापर करत आहेत.
मात्र, आधार (Aadhar) वापरकर्त्यांचा डेटा पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) केला आहे. पण तरीही काही लोकांच्या आधारचा गैरवापर होतो. बहुतेक प्रकरणांमध्ये, हे आधार वापरकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळे घडते.
डेटा सुरक्षा तज्ञांचे म्हणणे आहे की आधार वापरकर्त्यांनी सतर्क राहताना काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवल्या तर कोणीही आधार कार्डचा गैरवापर करू शकत नाही. आधार सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.
टू फॅक्टर औथेँटिकेशन
आधारचा गैरवापर रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल त्याच्याशी लिंक करणे. अस केल्यास आधार पडताळणीसाठी वन टाइम पासवर्ड म्हणजेच ओटीपी आवश्यक असेल.
ते आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर येईल. अशा परिस्थितीत OTP शिवाय आधारची पडताळणी करता येत नाही. अशा प्रकारे आधारचा गैरवापर टाळता येईल.
मास्क आधार कार्डचा वापर करा
आधार कार्डची छायाप्रत देण्याची गरज असल्यास, मास्क आधार कार्डची छायाप्रत द्यावी. मास्क आधारमध्ये संपूर्ण आधार क्रमांक नसून फक्त शेवटचे चार अंक असतात. याच्या मदतीने आधार पडताळणी केली जाते, मात्र पूर्ण आधार क्रमांक न दाखवल्याने त्याचा कोणीही गैरवापर करू शकत नाही.
बायोमेट्रिक्स लॉक ठेवा
बायोमेट्रिक्स लॉक करूनही तुम्ही तुमचा आधार सुरक्षित करू शकता. बायोमेट्रिक्स लॉक म्हणजे अंगठा, बोटे आणि बुबूळ यांचे निशाण किंवा ठसे यामुळे तुमच्या इच्छेविरुद्ध कोणीही आधार कार्ड वापरू शकत नाही. UIDAI च्या वेबसाइटला भेट देऊन कोणीही त्यांचे बायोमेट्रिक्स लॉक करू शकतात. बायोमेट्रिक्स लॉक केल्यानंतरही ओटीपी आधारित प्रमाणीकरण सुरू राहते. बायोमेट्रिक्स तात्पुरते किंवा कायमचे लॉक केले जाऊ शकतात.
व्हर्च्युअल आयडेंटिटी तयार करा
व्हर्च्युअल आयडेंटिटी (VID) मध्ये, आधार क्रमांक लपविला जातो आणि तात्पुरता 16 अंकी आभासी म्हणजे व्हर्च्युअल आयडी तयार केला जातो. यामध्ये वापरकर्त्याचा आधार क्रमांक जाहीर केलेला नसला तरी त्याची ओळख प्रमाणित केली जाते. VID फक्त काही काळासाठी वैध असते. आधार पोर्टल किंवा एम-आधार द्वारे व्हर्च्युअल आयडेंटिटी निर्माण करता येते.
Published on: 10 September 2022, 09:07 IST