Others News

Aadhar Card And Pan Card Mistake : मित्रांनो आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहेत. आधार कार्ड शिवाय तर भारतात साधं एक सिम देखील घेतल जाऊ शकत नाही. पॅन कार्ड देखील आधार कार्ड सारखेच महत्त्वाचे कागदपत्र असून याचा वित्तीय व्यवहारात किंवा बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

Updated on 02 September, 2022 8:02 AM IST

Aadhar Card And Pan Card Mistake : मित्रांनो आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहेत. आधार कार्ड शिवाय तर भारतात साधं एक सिम देखील घेतल जाऊ शकत नाही. पॅन कार्ड देखील आधार कार्ड सारखेच महत्त्वाचे कागदपत्र असून याचा वित्तीय व्यवहारात किंवा बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

आधार कार्ड भारतात एक महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे. पॅन कार्ड हे वित्तीय आणि बँकिंग कामासाठी एक महत्वाचे डॉक्युमेंट आहे. सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक करणे आता अनिवार्य केले आहे. मात्र अनेकदा आधार आणि पॅन कार्ड मध्ये नावांची गफलत झालेली असते. आधार मध्ये किंवा पॅन कार्ड मध्ये नावाच्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक असते किंवा अनेकदा संपूर्ण नाव चुकीचे असते.

अशा परिस्थितीत आज आपण आधार कार्ड तसेच पॅन कार्ड मधील नावाची कशा पद्धतीने दुरूस्ती केली जाऊ शकते याविषयी बहुमूल्य माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो काही वेळा आधार कार्ड आणि पॅन कार्डवर एकाच व्यक्तीची नावे वेगवेगळ्या प्रकारे छापली जातात.

एकतर त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक असते किंवा संपूर्ण नाव वेगळे लिहिले असते. जर तुमच्या बाबतीत देखील असंचं काहीस झालं असेल तर चिंता करू नका कारण की तुम्ही या समस्येचे निराकरण देखील करू शकता.

आधार कार्डमध्ये नाव दुरुस्त करण्यासाठी प्रोसेस

जर तुम्हाला देखील तुमच्या आधार कार्डच्या नावांमध्ये दुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला आधार नोंदणी केंद्राला भेट द्यावी लागणार आहे. आधार नोंदणी केंद्राला भेट दिल्यानंतर तिथे आधार बदलाचा फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर फॉर्ममध्ये सर्व माहिती योग्यरीत्या भरावी लागेल. या फॉर्मसोबत योग्य नाव आणि अचूक स्पेलिंगसह दस्तऐवज जोडावे लागतील.

तुमची माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला 25 ते 30 रुपये शुल्क देखील भरावे लागेल. ही फी रक्कम स्थान आणि केंद्रानुसार बदलू शकते. या प्रक्रियेचे अनुसरण केल्यानंतर तुमचे नाव बरोबर किंवा दुरुस्त केले जाईल.

पॅन कार्डमध्ये तुमचे नाव दुरुस्त करण्यासाठीची प्रोसेस 

पॅन कार्ड मधील तुमचे नाव दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाईटवर गेल्यावर 'करेक्शन इन एक्सिस्टिंग पॅन' हा पर्याय निवडावा लागेल. यानंतर श्रेणी प्रकार निवडा. योग्य नाव आणि अचूक स्पेलिंगसह कागदपत्रे जोडा. आता सबमिट बटणावर क्लिक करा. यासाठी फी देखील भरावी लागेल. अपडेट केलेले पॅन कार्ड अर्ज केल्याच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जाईल.

English Summary: aadhar card and pan card mistake name change process
Published on: 02 September 2022, 08:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)