यंदाच्या खरीप हंगामापासून पीक विमा योजनेच्या स्वरूपात बदल झालेला आहे जे की या योजनेसंबंधी केंद्र सरकारने नवीन निर्णय घेतला असून या शुक्रवारी याबाबत घोषणा सुद्धा केलेली आहे. पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी स्वतः शेतकऱ्यांच्या घरी येणार आहेत. पीक विमा योजनेला सुरुवात होऊन आतापर्यंत सहा वर्षे पूर्ण झालेली आहेत जे की या खरीप हंगामात सातव्या वर्षात पीक विमा योजना आपले पदार्पण करत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना कुठेही पळापळ न करता स्वतः कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या दारी जाऊन सहभाग नोंदवणार आहेत तसेच शेतकऱ्याना याबद्धल काही शंका असतील तर त्या शंका जग्यावरच मिटणार आहेत.
शेतकऱ्यांनाही समजणार योजनेची सर्व माहिती :-
पंतप्रधान पीक विमा योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ६ वर्ष पूर्ण झाली तर यंदाच्या वर्षांपासून पीक विमा योजना आपले सातवे वर्ष पदार्पण करत आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांना या योजनेबद्धल काही शंका आहेत ज्या की या शंका आता स्वतः कंपनीचे प्रतिनिधी मिटवणार आहेत. जून २०२२ पासून खरीप हंगामात सुरू होणाऱ्या या योजनेसाठी शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवण्यासाठी स्वतः कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या घरी जाणार आहेत तसेच शेतकऱ्यांच्या काही शंका असतील तर त्या सुद्धा जाग्यावर मिटवल्या जाणार आहेत. मेरी पॉलिसी मेरे हाथ हा उपक्रम जरी केंद्र सरकारने राबिवला असला तरी तो प्रत्यक्षात आमलात येतोय का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. फेब्रुवारी २०१६ पासून या योजनेस सुरुवात केली जे की नैसर्गिक आपत्ती मुळे पिकांचे नुकसान होते तर आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून ही योजना राबिवण्यात आलेली आहे.
योजनेमध्ये ८५ टक्के अल्प व अत्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश :-
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ३६ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा विमा पीएमएफबीवाय अंतर्गत उतरवण्यात आलेला आहे तर यावर्षी ४ फेब्रुवारी पर्यंत देशातून १ हजार कोटींपेक्षा जास्त दावे या योजनेअंतर्गत केले गेले आहेत. पीक विमा या योजनेमध्ये एकूण झालेल्या शेतकऱ्यांच्या नोंदणीपैकी ८५ टक्के शेतकरी हे अल्प व अत्यंत अल्पभूधारक आहेत त्यामुळे त्यांना अर्थिक मदत देण्यात यश येणार आहे. २०२० पासून जे शेतकरी ऐच्छिक आहेत त्यांनी सहभाग नोंदवावा असे करण्यात आले होते जे की याचा फायदा शेतकऱ्यांना भेटलेला आहे.
७२ तासाच्या आत शेतकऱ्यांना नुकसानीची द्यावी लागणार माहिती :-
नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेतकऱ्यांचे कोणत्याही पिकाचे नुकसान झाले असेल तर पीक विमा अॅप, सीएससी सेंटर किंवा जवळच्या कृषी अधिकारी यांच्या मार्फत ७२ तासाच्या आत शेतकऱ्यांनी जर नुकसानीची माहिती दिली तर त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. मात्र ज्यांनी पीक विमा योजनेमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे आणि जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे नाहीतर जे अपात्र शेतकरी आहेत त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
Published on: 21 February 2022, 07:52 IST