Others News

आपल्या आयुष्यात कधी काय होईल हे कोणालाही सांगता येत नाही. यामुळे आपल्याकडे सगळी सगळ्या सुख सोयी असणे गरजेचे आहे. भविष्याच्या सोयीसाठी विमा देखील अनेकजण काढतात. आता यामध्ये पोस्टाने टाटा एआयजीच्या अपघात संरक्षण विमा या योजनेशी करार केला असून प्रति वर्ष २९९ व ३९९ च्या हप्त्यात दहा लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जात आहे. यामुळे हे एक फायदेशीर आहे.

Updated on 21 July, 2022 5:01 PM IST

आपल्या आयुष्यात कधी काय होईल हे कोणालाही सांगता येत नाही. यामुळे आपल्याकडे सगळी सगळ्या सुख सोयी असणे गरजेचे आहे. भविष्याच्या सोयीसाठी विमा देखील अनेकजण काढतात. आता यामध्ये पोस्टाने टाटा एआयजीच्या अपघात संरक्षण विमा या योजनेशी करार केला असून प्रति वर्ष २९९ व ३९९ च्या हप्त्यात दहा लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जात आहे. यामुळे हे एक फायदेशीर आहे.

यामध्ये २९९ रुपयांच्या हप्त्यामध्ये १० लाख रुपयांपर्यंतचे विमा सुरक्षा कवच देण्यात येते. अपघातात विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वारसांना ५ हजार रुपये व या पोस्ट ऑफिस विमा योजनेअंतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी वयोमर्यादा ही १८ ते ६५ वर्षे आहे.

दरम्यान, विमाधारकाचा अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास १० लाख रुपये प्रदान करण्यात येतात. रुग्णालयाचा खर्च करण्यासाठी ६० हजार रुपये मिळतात. या योजनेअंतर्गत विमाधारकाच्या २ मुलांच्या शिक्षणाकरिता १ लाख रुपये दिले जातील. तसेच जर विमाधारक रुग्णालयामध्ये दाखल असल्यास दररोज १ हजार रुपये प्रति दिवस असे दहा दिवसांपर्यंत देण्यात येतील.

पावसाचा जोर ओसरला, आता नुकसानाच्या पंचनाम्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष

यामध्ये विमाधारकास ओपीडी खर्च ३०,००० रुपये मिळेल. विमाधारक व्यक्तीच्या कुटुंबास रुग्णालयाच्या प्रवासाकरिता प्रवास खर्च म्हणून २५,००० रुपये मिळतील. या विमा योजनेंतर्गत तुम्हाला विम्याची रक्कम ही वार्षिक भरायची आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन याचा लाभ घेऊ शकता.

महत्वाच्या बातम्या;
अमित शहांच्या सहकार मंत्राल्यास शरद पवार करणार मार्गदर्शन, सरकार मंत्रालयाने केलेली विनंती
एफआरपीचे 31 हजार कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
देवेंद्र फडणवीस करणार परतफेड? अजितदादांसाठी 'ती' जागा सोडण्याची शक्यता..

English Summary: A number! As much as 10 lakh insurance for just 299 rupees, read in detail..
Published on: 21 July 2022, 05:01 IST