Others News

नियमित कर्जदारांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला

Updated on 12 July, 2022 9:01 PM IST

नियमित कर्जदारांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता मात्र ते देताना त्यांनी जे निकष लावले त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळला नाही पूरग्रस्त शेतकरी यापासून वंचित राहतोय त्याचबरोबर आडसाली ऊस लागण करून कर्ज घेतलेला शेतकरी या योजनेपासून वंचित राहतोय केवळ दहा टक्के शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे त्या योजनेला आमचा विरोध होता ते निकष बदलावेत आणि सरसकट सर्वच नियमित कर्ज कर्जदार

शेतकऱ्यांना 50000/- प्रोत्साहनपर अनुदान द्यावे अशी आमची प्रमुख मागणी आहे नव्या सरकारने महाविकास आघाडी सरकारचा निर्णय रद्द ठरवला म्हणजे सरकार नेमके कुणाचे आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे पूर्वीच्या सरकारने लावलेले निकष बदलावेत आणि नव्या सरकारने रद्द केलेला निर्णय मागे घेऊन सरसकट नियमित कर्जदारांना 50000 प्रोत्साहन पर अनुदान द्यावे या प्रमुख मागणीसाठी सोमवार दिनांक 18 जुलै रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेआहे

नियमित कर्जदारांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता मात्र ते देताना त्यांनी जे निकष लावले त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळला नाही पूरग्रस्त शेतकरी यापासून वंचित राहतोय त्याचबरोबर आडसाली ऊस लागण करून कर्ज घेतलेला शेतकरी या योजनेपासून वंचित राहतोय केवळ दहा टक्के शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे त्या योजनेला आमचा विरोध होता ते निकष बदलावेत आणि सरसकट सर्वच नियमित कर्ज कर्जदार

हा मोर्चा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे मोर्चाचा प्रारंभ सकाळी 11 वाजता क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा विश्रामबाग चौक सांगलीयेथून होणार आहे तरी या मोर्चाला मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे शेतकरी जेवढे जास्त तेवढी मागणी लवकर मान्य होईल त्यामुळे राजकारण ,गट,तट ,पक्ष बाजूला सारून आर्थिक हितासाठी शेतकऱ्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे राजकारण आणि अर्थकारण या दोन भिन्न बाबी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी राजकारणासाठी आपल्या आर्थिक हिताला तिलांजली देवू नये अर्थकारणाला महत्व द्या राजकारण बाजूला ठेवा सद्या शेतकरी राजकारणासाठी स्वताच्या आर्थिक हिताला मूठमाती देत आहे आर्थिक हितासाठी मोर्चात सामील व्हा कळावे

महेशभाऊ खराडे

जिल्हाध्यक्ष

स्वाभिमानी शेतकरी पक्ष सांगली

9850693701

8329121717

English Summary: A grand march at Sangli for regular borrowers to get Rs 50,000 grant
Published on: 12 July 2022, 09:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)