Others News

7th pay commission: केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी येणारे वर्ष म्हणजे 2023 खूप चांगले ठरणार आहे. मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवला तर 2023 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ होऊ शकते. एका अंदाजानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३ ते ५ टक्क्यांनी वाढू शकतो.

Updated on 06 December, 2022 9:40 AM IST

7th pay commission: केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी येणारे वर्ष म्हणजे 2023 खूप चांगले ठरणार आहे. मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवला तर 2023 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ होऊ शकते. एका अंदाजानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३ ते ५ टक्क्यांनी वाढू शकतो.

दिवाळीत डीए वाढ

सरकारने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ केली होती. मात्र, सरकारी कर्मचारी 18 महिन्यांच्या डीए थकबाकीच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारने दिवाळीपूर्वी सप्टेंबर महिन्यात डीए आणि डीआरमध्ये ४ टक्के वाढ केली होती.

याचा फायदा देशातील 48 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना झाला. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३८ टक्के दराने महागाई भत्त्याचा लाभ मिळत आहे.

Agricultural Loans: एका दिवसात शेतकऱ्यांना या बँकेने दिले 134 कोटी रुपये

2023 मध्ये एवढी टक्केवारी DA वाढ

पुढील वर्षी मार्च 2023 मध्ये डीएमध्ये पुन्हा वाढ करण्याचा सरकारचा विचार आहे. प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांनुसार डीएमध्ये ३ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. ही वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४३ टक्क्यांपर्यंत वाढेल. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारातही भरीव वाढ अपेक्षित आहे.

कर्मचार्‍यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये होणार वाढ! सरकारने घेतला मोठा निर्णय!

पगार किती वाढणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2023 मध्ये महागाई भत्त्याची भेट मिळणार आहे. वृत्तानुसार, मार्च 2023 मध्ये होळीच्या आसपास महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली जाईल. महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली, तर वाढीनंतर महागाई भत्ता 42 टक्क्यांवर पोहोचेल. त्यामुळे किमान मूळ पगारात दरमहा एकूण 720 रुपयांची वाढ होणार आहे.

कमाल वेतन श्रेणीसाठी, ही वाढ दरमहा 2276 रुपये असेल. वास्तविक, कामगार मंत्रालयाने ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स-इंडस्ट्रियल वर्कर्स (AICPI) ची आकडेवारी जाहीर केली आहे.

सप्टेंबरमध्ये हा आकडा 131.2 इतका होता. जूनच्या तुलनेत सप्टेंबर 2022 पर्यंत AICPI निर्देशांकात एकूण 2.1 टक्के वाढ झाली आहे. गेल्या महिन्याच्या ऑगस्टच्या तुलनेत 1.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

भारताची जैव अर्थव्यवस्था गेल्या 8 वर्षांत 8 पटींनी वाढली : केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

English Summary: 7th pay commission: to increase by 5 percent in 2023 salary increase
Published on: 04 December 2022, 10:12 IST