Others News

7th Pay Commission Update: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आनंदाची बातमी मिळू शकते. डीएमध्ये वाढ केल्याने, सरकार 18 महिन्यांच्या (18 months DA arrears) थकबाकीवरही निर्णय घेऊ शकते. केंद्रीय कर्मचारी दीर्घकाळापासून सरकारकडे त्यांचा थकित डीए देण्याची मागणी करत आहेत.

Updated on 29 July, 2022 2:45 PM IST

7th Pay Commission Update: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आनंदाची बातमी मिळू शकते. डीएमध्ये वाढ केल्याने, सरकार 18 महिन्यांच्या (18 months DA arrears) थकबाकीवरही निर्णय घेऊ शकते. केंद्रीय कर्मचारी दीर्घकाळापासून सरकारकडे त्यांचा थकित डीए देण्याची मागणी करत आहेत.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार थकबाकी! Central employees will get dues

सरकार पुढील महिन्यात लाखो कर्मचार्‍यांचे थकित डीए भरू शकते, अशी बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आहे. खरं तर, केंद्रीय कर्मचारी जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीत सरकारकडे रोखलेल्या डीएची मागणी करत आहेत. याआधी अनेकवेळा सरकार कर्मचाऱ्यांच्या खात्यात डीएच्या थकबाकीचे 2 लाख रुपये टाकणार असल्याच्या बातम्या आल्या.

मात्र सरकारने दरवेळी त्याचा इन्कार केला आणि कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आजही सुरूच आहे. आता सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात 1.50 लाख रुपये एकरकमी टाकण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा: 7th Pay Commission: खुशखबर! कर्मचाऱ्यांना DA सोबत मिळणार आणखी एक वाढ!

बैठकीत निर्णय होऊ शकतो

विशेष म्हणजे, वित्त मंत्रालयाच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि खर्च विभाग (DOPT) च्या अधिकाऱ्यांची संयुक्त सल्लागार यंत्रणा (JSM) ची बैठक होणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या डीए थकबाकीवर चर्चा होऊ शकते.

या बैठकीत महागाई भत्ता वाढीबाबतही घोषणा अपेक्षित आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या 34 टक्के दराने DA दिला जात आहे, परंतु AICPI च्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये DA मध्ये 5 ते 6% वाढ होऊ शकते.

हे ही वाचा: Business: फक्त 10 हजार रुपयात सुरू करा 'हा' व्यवसाय, वर्षभर होईल कमाई

18 महिन्यांची थकबाकी 18 months arrears

कोविडमुळे सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांचा 18 महिन्यांचा डीए होल्ड केला होता. यानंतर कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये अनेकवेळा वाढ करण्यात आली मात्र अद्यापपर्यंत थकबाकी मिळालेली नाही. सरकार लवकरच त्यांची थकबाकी काढेल, अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे.

अद्यापपर्यंत थकबाकी डीए भरण्याबाबत आणि वाढीबाबत सरकारकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या बँडनुसार डीएची थकबाकी मिळेल.

हे ही वाचा: Post Office: पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; लागू झाला 'हा' नवीन नियम

English Summary: 7th Pay Commission The government will pay not 2 lakhs but almost as much money on DA arrears
Published on: 29 July 2022, 02:30 IST