Others News

7th pay commission : सातत्याने महागाईचा सामना करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. रेल्वे बोर्डाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एकाच वेळी १४ टक्क्यांनी वाढ केली आहे. महागाई भत्त्यात ही वाढ दोन पटीच्या आधारे करण्यात आली आहे.

Updated on 19 May, 2022 2:08 PM IST

7th pay commission : सातत्याने महागाईचा सामना करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. रेल्वे बोर्डाने (Railway Board) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एकाच वेळी १४ टक्क्यांनी वाढ केली आहे. महागाई भत्त्यात ही वाढ दोन पटीच्या आधारे करण्यात आली आहे.

१० महिन्यांची थकबाकी ही मिळणार

ज्या कर्मचाऱ्यांना ही डीए वाढ लागू होणार आहे, त्यांच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे त्यांना १० महिन्यांची डीए वाढीची थकबाकी देण्याचेही सांगण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाकडून सांगण्यात आले की, ७-७ टक्क्यांच्या दोन भागात ही डीए वाढ 6व्या वेतन आयोगाखाली अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होईल.

महागाई भत्ता २०३ टक्क्यांनी वाढला

१ जुलै २०२१ पासून महागाई भत्त्यात ७ टक्के आणि १ जानेवारी २०२२ पासून ७ टक्के वाढ करण्यात आली आहे. सध्या सहाव्या वेतन आयोगांतर्गत पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना १८९ टक्के डीए मिळत आहे.

1 जुलै 2021 पासून या कर्मचाऱ्यांचा डीए 7 टक्क्यांनी वाढून 196 टक्के होईल. त्याचप्रमाणे 1 जानेवारी 2022 पासून 7 टक्के वाढ केल्यावर ते 203 टक्के होईल, जे कर्मचाऱ्यांना 10 महिन्यांच्या थकबाकीसह मे महिन्याचे वेतन मिळेल.

PM kisan: 2 हजार रुपये मिळवण्यासाठी eKYC अनिवार्य, आता घरबसल्या करता येणार eKYC; जाणून घ्या प्रक्रिया

रेल्वे कर्मचाऱ्यांना दुहेरी फायदा

रेल्वे बोर्डाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे. वित्त संचालनालय आणि रेल्वे मंत्रालयाच्या मंजुरीनंतर रेल्वे बोर्डाने हा निर्णय लागू केला आहे. यापूर्वी मार्चमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. सातव्या वेतन आयोगाखाली पगार मिळालेल्या लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा झाला.

PM kisan Yojana : ठरलं तर ! 'या' तारखेला खात्यात येणार 2 हजार रुपये

English Summary: 7th pay commission: The government has made a big increase in the DA of employees
Published on: 19 May 2022, 02:08 IST