7th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. सरकारने मार्च 2022 मध्ये महागाई भत्ता वाढवल्यानंतर आता जुलै 2022 मध्ये महागाई भत्ता (DA) वाढण्याची अपेक्षा आहे. यावेळी डीएमध्ये ३ टक्के वाढ अपेक्षित आहे. सरकारने हा निर्णय घेतल्याने सुमारे 1 कोटी लोकांना थेट लाभ मिळणार आहे.
जानेवारी आणि फेब्रुवारीच्या एआयसीपी (AICP Index) निर्देशांकात घट झाल्यानंतर मार्चच्या एआयसीपी निर्देशांकात (AICP Index) मोठी झेप होती. जानेवारी 2022 मध्ये AICPI निर्देशांक 125.1 वर होता. यानंतर फेब्रुवारीमध्ये त्यात घसरण होऊन 125 वर पोहोचला. आता यानुसार मार्चमध्येही घसरण अपेक्षित होती, पण तो 1 अंकाने झेपावला आणि तो 126 वर पोहोचला.
7th Pay Commission: 7व्या वेतन आयोगानंतर 8वा वेतन आयोग येणार की नाही? जाणून घ्या अपडेट
आता मार्चचे आकडे पाहता, जुलै 2022 मध्ये महागाई भत्ता (DA) 3 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, एप्रिल, मे आणि जूनची आकडेवारी आल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. येत्या काही महिन्यांतही हाच ट्रेंड कायम राहिला तर महागाई भत्त्याचा (डीए हाईक) आकडा ४ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो.
पुढील DA जुलैमध्ये येणार
आता पुन्हा महागाई भत्ता (पुढील डीए वाढ) जुलैमध्ये सुधारित केला जाईल. त्याचा आधार जानेवारी ते जून या कालावधीतील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक असेल. त्यानुसार जुलैमध्ये डीए वाढण्याची शक्यता बळावली आहे. डीए वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार हे उघड आहे. याचा थेट फायदा करोडो कर्मचाऱ्यांना होणार आहे.
DA पूर्वी इतका वाढला:
जुलै 2021 मध्ये केंद्राने महागाई भत्ता आणि महागाई सवलत 17 वरून 28 टक्क्यांपर्यंत वाढवली. यानंतर कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारने सुमारे दीड वर्ष महागाई भत्ता वाढवला नाही. त्याच वेळी, ऑक्टोबर 2021 मध्ये 3 टक्के वाढ झाली, त्यानंतर कर्मचार्यांचा डीए 31 टक्के झाला. आता तो 3 टक्क्यांवरून 34 टक्के करण्यात आला आहे.
IMD Alert : मान्सून अडकला; महाराष्ट्रातील मान्सूनची तारीख बदलली, जाऊन घ्या तारीख..
Published on: 26 May 2022, 11:35 IST