Others News

7th Pay Commission: रक्षाबंधनापूर्वी केंद्रातील एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची प्रतीक्षा जवळपास संपली आहे.

Updated on 07 August, 2022 5:24 PM IST

7th Pay Commission: रक्षाबंधनापूर्वी केंद्रातील एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची प्रतीक्षा जवळपास संपली आहे.

केंद्र सरकार लवकरच आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई वाढवण्याची घोषणा करू शकते. यावेळी महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. या वाढीनंतर डीए ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के होईल.

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जानेवारी आणि जुलैमध्ये वर्षातून दोनदा वाढ केली जाते. आतापर्यंत सरकारने जुलै महिन्याचा डीए वाढवलेला नाही. अशा परिस्थितीत सरकार लवकरच महागाई भत्ता वाढवू शकते.

DA मधील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) च्या आधारावर DA मधील वाढ निश्चित केली जाते. यावेळी जून महिन्यात किरकोळ महागाईचा दर ७.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा महागाई दर आरबीआयच्या 2 ते 6 टक्क्यांच्या निश्चित महागाई दरापेक्षा जास्त आहे.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार नव्या सूत्राने वाढणार! सरकारचा मोठा निर्णय

7व्या वेतन आयोगात किमान मूळ वेतन 18,000 रुपये आणि कॅबिनेट सचिव स्तरावर 56,900 रुपये आहे. 38 टक्क्यांनुसार 18000 रुपयांच्या मूळ पगारावर वार्षिक डीएमध्ये एकूण 6840 रुपयांची वाढ मिळणार आहे.

एकूण डीए दरमहा 720 रुपयांनी वाढेल. 56,900 रुपयांच्या कमाल मूळ वेतनाच्या ब्रॅकेटमध्ये, वार्षिक महागाई भत्त्यात एकूण वाढ 27,312 रुपये असेल. या पगाराच्या ब्रॅकेटमध्ये असलेल्यांना 34 टक्क्यांच्या तुलनेत 2276 रुपये अधिक मिळतील.

EPF ची दोन्ही खाती अशा प्रकारे करा एकत्र, जाऊन घ्या सोपी पद्धत..

किमान मूळ पगाराची गणना

कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रुपये
नवीन महागाई भत्ता (38%) रु.6840/महिना
आतापर्यंत महागाई भत्ता (34%) रुपये 6120/महिना
किती महागाई भत्ता वाढला 6840-6120 = रु. 1080/महिना
वार्षिक पगारात वाढ 720 X 12 = रु 8640

कमाल मूळ पगाराची गणना

कर्मचार्‍यांचे मूळ वेतन रु 56,900
नवीन महागाई भत्ता (38%) रुपये 21,622/महिना
आतापर्यंत महागाई भत्ता (34%) रुपये 19,346/महिना
महागाई भत्ता किती वाढला 21,622-19,346 = रु 2260/महिना
वार्षिक पगारात वाढ 2260 X12 = रु. 27,120

सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ केल्याने देशातील 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होईल कारण त्यांच्या पगारात वाढ होणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला सरकारने महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवला होता, त्यानंतर महागाई भत्ता ३४ टक्क्यांवर गेला होता. आता महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढल्याने महागाई भत्ता 38 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.

English Summary: 7th Pay Commission: Rakshabandhan gift to central employees
Published on: 07 August 2022, 05:24 IST