7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) घोषणा करण्यात आली आहे. नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात ४ टक्के वाढ जाहीर केली होती. यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांचा महागाई सवलत 38 टक्क्यांवरून 42 टक्क्यांवर पोहोचला आहे.
लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंत्रिमंडळाच्या घोषणेनंतर 48 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे. जानेवारी 2023 पासून महागाई भत्ता वाढ लागू होणार आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मार्चचा पगार वाढणार आहे. वाढीव डीएसोबतच दोन महिन्यांची डीएची थकबाकीही त्यात जोडली जाणार आहे.
डीए वाढल्यानंतर सरकारचा आर्थिक खर्च वाढणार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महागाई भत्ता वाढीमुळे 14 महिन्यांत सरकारवर 14,951.52 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडेल. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासाठी केंद्र सरकार १४ महिन्यांत ७,६४६.८ कोटी रुपये खर्च करणार आहे. त्याच वेळी, महागाई निवारणासाठी वार्षिक 6261.2 कोटी रुपये खर्च होतील.
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी... खात्यात 15 लाख येणार, कोणाला मिळणार फायदा, वाचा सविस्तर...
मार्चमध्ये पगार किती वाढणार
ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन किमान 18 हजार रुपये आहे, डीए वाढल्यानंतर त्यांच्या पगारात दरमहा 720 रुपयांची वाढ होणार आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची डीए थकबाकी आणि मार्चमधील वाढीव महागाई भत्त्यानंतर आणखी 2160 रुपये येतील.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्चमध्ये अधिक पगार मिळणार
त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांचा पगार सर्वाधिक 56,900 रुपये आहे, डीए वाढल्यानंतर त्यांच्या मासिक पगारात 2,276 रुपयांची वाढ होईल. त्यात जानेवारी आणि फेब्रुवारीची डीए थकबाकी जोडली तर 6,828 रुपये होतात. म्हणजेच या कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार ६,८२८ रुपयांनी वाढणार आहे. डीए आणि डीए थकबाकी व्यतिरिक्त, इतर भत्त्यांमुळे या पगारात बदल होऊ शकतो.
Published on: 27 March 2023, 12:06 IST