Others News

7th Pay commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका बसला आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या. मात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत केंद्र सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निराशा पाहायला मिळत आहे.

Updated on 26 August, 2022 11:48 AM IST

7th Pay commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका बसला आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central employees) महागाई भत्त्यात (DA) वाढ होणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या. मात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत केंद्र सरकारने (Central Goverment) कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निराशा पाहायला मिळत आहे.

सरकारने दिलेली माहिती

प्रत्यक्षात गेल्या काही दिवसांपासून डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिच (Department of Expenditure) विभागाचे एक पत्र सोशल मीडियावर फिरत आहे. या पत्रात सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ४ टक्क्यांनी वाढ केल्याचे सांगण्यात आले आहे. या पत्रात म्हटले आहे की, आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवून ३८ टक्के करण्यात आला आहे. हा वाढलेला महागाई भत्ता जुलैपासून लागू झाला आहे.

आता पीआयबीने याची चौकशी केली असून पीआयबी फॅक्ट चेकमध्ये (PIB Fact Check) हे पत्र पूर्णपणे बनावट असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. हे पत्र 23 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आले आहे. पीआयबीने तपास केला असता त्यात दिलेली माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचे समोर आले.

Weather Update: महाराष्ट्रात आजही मुसळधार पावसाची शक्यता! हवामान खात्याचा अलर्ट जारी

७व्या वेतन आयोगाच्या शिफारशी

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे, सहामाही आधारावर दरवर्षी दोनदा महागाई भत्ता वाढविला जातो. त्यानुसार सरकारने जानेवारी 2022 मध्ये या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत वाढ केली आहे. यावेळी सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केली होती.

दुसऱ्या सहामाहीसाठी म्हणजेच जुलै ते डिसेंबर या कालावधीसाठी महागाई भत्त्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. पण AICPI च्या आकडेवारीनुसार त्यात वाढ होणार हे नक्की.

मोदी सरकारकडून स्वस्तात सोने खरेदी करायचा आज शेवटचा दिवस! 10 ग्रॅम सोन्यावर मिळवा 2186 रुपयांचा फायदा

आठवा वेतन आयोग कधी येणार?

दरम्यान, आठव्या वेतनाच्या रकमेबाबतही गदारोळ सुरू झाला होता. मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8वा केंद्रीय वेतन आयोग स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. म्हणजेच सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू राहतील.

महत्वाच्या बातम्या:
सर्वोत्कृष्ट दूध उत्पादकाला केंद्र सरकार देणार 5 लाख रुपयांचे बक्षीस; 15 सप्टेंबरपर्यंत असा करा अर्ज
गोपालखेड येथे जैविक कृषी निविष्ठा केंद्राचे उदघाटन; शेतकऱ्यांना होणार फायदा...

English Summary: 7th Pay commission: information given by government regarding inflation allowance
Published on: 26 August 2022, 11:48 IST