Others News

7th Pay Commission News: सरकारी कर्मचाऱ्यांना (Government employees) आता फक्त काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. पुढील महिन्यात सरकार महागाई भत्ता (dearness allowance) वाढवू शकतो.

Updated on 23 July, 2022 10:03 AM IST

7th Pay Commission News: सरकारी कर्मचाऱ्यांना (Government employees) आता फक्त काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. पुढील महिन्यात सरकार महागाई भत्ता (dearness allowance) वाढवू शकतो. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, सरकार बुधवार, 3 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत (Cabinet meeting) डीए वाढवण्याबाबत चर्चा करू शकते. म्हणजेच कर्मचार्‍यांचा डीए वाढण्यास ११ दिवस उरले आहेत.

मे महिन्यात एआयसीपीआय निर्देशांकात वाढ झाल्याने डीए 4 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा वाढली आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के होईल. असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात २७ हजारांहून अधिक वाढ होऊ शकते.

हे ही वाचा: 8th Pay Commission: खुशखबर! कर्मचाऱ्यांचे पगार तब्बल इतक्या रुपयांनी वाढणार

डीए मध्ये होणार वाढ Increase in DA

औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाचा डेटा 127 अंकांपेक्षा जास्त आहे. (Indian Consumer Price Index) अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) डेटाच्या आधारे DA निश्चित केला जातो. जूनची आकडेवारी येणे बाकी आहे. हेही जास्त राहिल्यास ऑगस्ट महिन्यात महागाई भत्ता वाढण्याची खात्री आहे.

38 टक्के असेल तर पगार इतका वाढेल

कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 56,900 रुपये आहे, 38 टक्के महागाई भत्ता असल्यास त्यांना 21,622 रुपये डीए मिळेल. सध्या 34 टक्के डीए दराने 19,346 रुपये 34 टक्के दराने मिळत आहेत. डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाल्याने पगारात 2,276 रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजेच वर्षाला सुमारे २७,३१२ रुपयांची वाढ होणार आहे.

हे ही वाचा: Amazon sale : ऑफर!! मोबाईल खरेदी करताय? २३ जुलैपासून Amazon वर मिळणार 20,000 रुपयांपर्यंत सूट

50 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार

सरकार वर्षातून दोनदा डीए वाढवते. या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने डीएमध्ये (DA) एकदाच वाढ केली आहे. सध्या डीए ३४ टक्के आहे. त्यात आणखी 4 टक्क्यांची वाढ झाली तर ती 38 टक्के होईल. या निर्णयाचा फायदा 50 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

हे ही वाचा: Electric Cars News : 5 सेकंदात 100 किमीचा वेग! ही इलेक्ट्रिक कार धमाका करण्यासाठी सज्ज; सिंगल चार्ज मध्ये ४१८ किमी

English Summary: 7th Pay Commission: Increase in salary of government employees by Rs. 27 thousand
Published on: 23 July 2022, 10:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)