7th Pay Commission: दिवाळीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे. नवरात्रीच्या आधी महागाई भत्त्यात (DA) चार टक्क्यांनी वाढ केल्यानंतर पुढील वर्षी जानेवारी 2023 पासून DA वाढण्याची अपेक्षा आहे. सर्व काही असेच राहिले तर पुढील वर्षीही महागाई भत्ता तीन ते चार टक्क्यांनी वाढू शकतो.
दरम्यान, अशी बातमी आहे की, केंद्र सरकार लवकरच 52 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचार्यांच्या फिटमेंट फॅक्टमध्ये वाढ करू शकते. विशेष म्हणजे फिटमेंट फॅक्टर अंतर्गत मूळ पगार वाढतो. किंबहुना, केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून केंद्र सरकारकडे फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करत आहेत.
बेरोजगार मजुरांसाठी सरकार देणार 5000 रुपये; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 2.57 टक्के फिटमेंट फॅक्टर दिला जात आहे. ती 3.68 पट वाढवून देण्याची मागणी केली जात आहे. फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.68 वर वाढवल्यास किमान मूळ वेतन 18,000 वरून 26,000 रुपये होईल. केंद्र सरकारने ही मागणी मान्य केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात प्रचंड वाढ होणार आहे.
EPFO पेन्शनधारक सावध! निवृत्तीनंतरचे पैसे काढण्यावर आला हा नवा नियम
विशेष म्हणजे, फिटमेंट फॅक्टरची मुदत 2016 मध्ये वाढवण्यात आली होती. सातवा वेतन आयोगही याच वर्षी लागू झाला आहे. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन थेट ६००० ते १८,००० रुपये होते. तर सर्वोच्च पातळी ९० हजारांवरून अडीच लाखांपर्यंत वाढवली. आता सरकार या वर्षी पुन्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करू शकते.
फिटमेंट फॅक्टर सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मूळ वेतन निश्चित करतो. यावेळी, फिटमेंट फॅक्टरमध्ये संभाव्य वाढ झाल्यास, किमान मूळ वेतन 18000 रुपयांवरून 26000 रुपये होईल.
Published on: 04 November 2022, 01:19 IST