Others News

7th Pay Commission: वाढत्या महागाईच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी केंद्र सरकार अनेक निर्णय घेत असते. केंद्र सरकार आता लवकरच ८वा वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत आहे. मात्र त्याआधी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवणार असल्याची माहिती मिळत आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करणारे लाखो कर्मचारी दीर्घकाळापासून डीए वाढवण्याची मागणी करत आहेत. अ

Updated on 22 July, 2022 3:28 PM IST

7th Pay Commission: वाढत्या महागाईच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांचे (Central employees) जीवनमान सुधारावे यासाठी केंद्र सरकार अनेक निर्णय घेत असते. केंद्र सरकार (Central Goverment) आता लवकरच ८वा वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत आहे. मात्र त्याआधी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा डीए (DA) वाढवणार असल्याची माहिती मिळत आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करणारे लाखो कर्मचारी दीर्घकाळापासून डीए वाढवण्याची मागणी करत आहेत.

अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Inflation Allowances) म्हणजेच डीएमध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ (Salary increase) करण्याचा मार्ग आता दिसत आहे.

महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढू शकतो

मे महिन्यातील ग्राहक महागाईच्या आकडेवारीवरून केंद्र सरकारमधील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, जून महिन्यातील ग्राहक महागाईची आकडेवारी येणे बाकी आहे. त्याची आकडेवारी ३१ जुलै रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर महागाई भत्त्यात एकूण किती वाढ होणार हे ठरवले जाईल.

PM Kisan: महत्वाची बातमी! पीएम किसान योजनेतून हे शेतकरी बाद, मिळणार नाही आर्थिक लाभ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकाशी जोडलेला आहे. जर हा आकडा सतत वाढत असेल तर त्यानुसार महागाई भत्ताही वाढवला जातो. पहिल्या सहामाहीत पाच महिन्यांची आकडेवारी जाहीर झाली आहे. जूनचे आकडे येणे बाकी आहे.

जूनमध्ये हा आकडा 130 वर पोहोचेल असा दावा तज्ज्ञ करत आहेत. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मे महिन्यात अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाचा आकडा १२९ अंकांवर होता. त्यामुळे आगामी काळात महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ होणार हे निश्चित आहे.

राष्ट्रपतींना किती पगार मिळतो? कोणत्या सुविधा मिळतात; जाणून घ्या...

DA इतका वाढेल

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ केल्यास त्यांचा डीए ३८ टक्के होईल. तुम्हाला सांगतो की, सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३४ टक्के दराने डीए दिला जातो.

पगार खूप वाढेल

सातव्या वेतन आयोगांतर्गत किमान मूळ वेतन 18,000 रुपये पाहिल्यास 38 टक्के दराने वार्षिक महागाई भत्त्याची एकूण वाढ 6840 रुपये होईल. म्हणजेच सध्याच्या महागाई भत्त्याच्या तुलनेत दरमहा ७२० रुपये वाढणार आहेत. एकूण, 18000 रुपये मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षाला 8640 रुपये अधिक महागाई भत्ता मिळेल.

महत्वाच्या बातम्या:
वाह क्या बात है! फक्त 15 हजार गुंतवले आणि 15 लाख कमावतोय हा शेतकरी; मुख्यमंत्र्यांकडूनही गौरव
ऑफर ऑफर! फक्त 18 हजारांमध्ये हिरो एचएफ डिलक्स खरेदी करा; जाणून घ्या ऑफर...

English Summary: 7th Pay Commission: DA increase 4 percent along salary hike central employees
Published on: 22 July 2022, 03:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)