Others News

7th Pay Commission : केंद्र सरकारकडून (Central Government) कर्मचाऱ्यांसाठी विविध निर्णय घेतले जातात. त्याचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Staff) होतो. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे.

Updated on 02 June, 2022 11:07 AM IST

7th Pay Commission: केंद्र सरकारकडून (Central Government) कर्मचाऱ्यांसाठी विविध निर्णय घेतले जातात. त्याचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Staff) होतो. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महागाई भत्त्यात (DA) वाढ केल्यानंतर केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा सुमारे 1.25 कोटी लोकांना होणार आहे. केंद्र सरकार आता लवकरच महागाई भत्ता (DA) वाढवणार आहे. ज्याची कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकार महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डीए आता 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ अपेक्षित आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जुलैपासून कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार असल्याचे मानले जात आहे. केंद्र सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र काही मीडिया रिपोर्ट्स असा दावा करत आहेत.

7th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच वाढणार पगार, जाणून घ्या का?

डीए वाढल्याने पगारात हजारांनी वाढ होणार आहे. केंद्र सरकारने डीए 4 टक्क्यांनी वाढवल्यास पगारात पूर्ण 27,000 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता मानली जाते.

पगार कसा वाढेल ते जाणून घ्या

AICPI निर्देशांकानुसार, केंद्र सरकार यावेळी महागाई भत्ता (DA) पूर्ण 4 टक्क्यांनी वाढवू शकते. यानंतर कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्क्यांवरून 38 टक्के होईल. 2022 च्या पहिल्या दोन महिन्यांत निर्देशांकात घसरण होईल. तो जानेवारीमध्ये 125.1, फेब्रुवारीमध्ये 125 आणि मार्चमध्ये 126 होता. एप्रिल, मे आणि जूनमध्ये 126 च्या वर राहिल्यास सरकार डीए 4 टक्क्यांनी वाढवू शकते.

7th pay commission: सरकारने कर्मचार्‍यांच्या DA मध्ये केली मोठी वाढ; थकबाकी ही मिळणार

तुम्हाला, जुलैच्या पगारात थकबाकीसह वाढीव रक्कम मिळू शकते. तुमचा पगार किती वाढला ते आम्ही तुम्हाला सांगतो. माहितीसाठी, जर तुमचा मूळ पगार 56,900 रुपये असेल, तर त्यानुसार, तुम्हाला यावेळी 19,346 रुपये DA मिळत आहेत. जर तुम्हाला 38 टक्के दराने DA मिळत असेल तर तुमचा DA 21,622 रुपये होईल. त्यानुसार, तुमचा पगार वार्षिक 27,312 रुपयांनी वाढेल.

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट ! DA वाढू शकतो, जाणून घ्या किती वाढणार...

English Summary: 7th Pay Commission: Central Government ready to take big decision
Published on: 02 June 2022, 11:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)